मुंबई: लॉकडाउनच्या काळात बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांनी तिसरी खिडकी, म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मला जवळ केलं. तरुण कलाकारच नव्हे, तर ज्येष्ठ मंडळीसुद्धा या माध्यमावर रुळत आहेत. ओटीटीची भुरळ बॉलिवूडमधल्या बड्या ताऱ्यांनाही पडली आहे. त्यामुळे येत्या काळात बरेच बडे स्टार्स ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतील. अलीकडेच 'ब्रीथ इनटू द शॅडोज' या सीरिजचं पोस्टर लाँच करण्यात आलं. दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या 'ब्रीथ' या सीरिजचा हा दुसरा भाग आहे. अभिषेक बच्चन या सीरिजमधून ओटीटीवर येतोय. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव 'द व्हाइट टायगर' या सीरिजमध्ये दिसतील. 'सेक्रेड गेम्स'च्या माध्यमातून सैफ अली खाननं सीरिज विश्वात पाय ठेवला. आता 'दिल्ली' या सीरिजच्या माध्यमातून सैफ पुन्हा एकदा ओटीटीवर झळकणार आहे. या सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री डिम्पल कपाडियासुद्धा असतील. त्याशिवाय, सोनाक्षी सिन्हाची 'फॉलन फॉर रिमा' या सीरिजची जबरदस्त चर्चा आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताच्या जीवनावर आधारित सीरिजमध्ये तिची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता दिसतील. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टी गाजवणारी समंथा 'द फॅमिली मॅन २' या सीरिजच्या माध्यमातून हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करतेय. करण जोहर एका सीरिजचं दिग्दर्शन करणार असून, त्यामध्ये करिना कपूर मुख्य भूमिकेत दिसेल असं कळतंय. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांच्या आयुष्यावर आधारित सीरिज महेश भट आणणार असून, त्यात बड्या कलाकारांचा सहभाग असेल अशी चर्चा आहे. निर्मितीतही पाऊल काही बडे कलाकार सीरिजची निर्मितीही करताहेत. अनुष्का शर्माची निर्मिती असलेली '' सीरिजची जबरदस्त चर्चा झाली. लवकरच अनुष्काची निर्मिती असलेली क्राइम थ्रिलर सीरिज नेटफिलिक्सवर येणार आहे. शाहरुख खाननं '' आणि '' या सीरिजची निर्मिती केली. तर अभिनेता- दिग्दर्शक अजय देवगण 'लालाबाझार' ही सीरिज सादर करत आहे. कमबॅक करण्यासाठी... अनेक बडे कलाकार ओटीटीकडे कमबॅक करण्याचा पर्याय म्हणून बघत आहेत. अलीकडेच लारा दत्ताने 'हंड्रेड'मधून, तर करिश्मा कपूरनं 'मेंटलहूड' या सीरिजमधून कमबॅक केलं. काही वर्षं मनोरंजनसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री गुल पनाग 'पाताल लोक'मध्ये दिसली. सुश्मिता सेन अनेक वर्षांनी 'आर्या' या वेब सीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहे. तसंच अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचा अभिनय 'मुंबई डायरीज' सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. तर 'युअर ऑनर' सीरिजमध्ये जिम्मी शेरगील झळकणार आहे. वेब सीरिज- कलाकार - सेक्रेड गेम्स- सैफ अली खान - सेक्रेड गेम्स- नवाझुद्दीन सिद्दकी - इट्स नॉट दॅट सिम्पल- स्वरा भास्कर - द फॅमिली मॅन- मनोज बाजपेयी - बार्ड ऑफ बल्ड- इम्रान हाश्मी - मेड इन हेवन- सोभिता धुलिपाला - स्मोक- कल्की कोएचिलीन - सेक्रेड गेम्स- राधिका आपटे - लैला- हुमा कुरेशी - द फायनल कॉल- अर्जुन रामपाल - काफीर- दिया मिर्झा - द ग्रेट इंडीयन डिसफक्शनल फॅमिली- के. के. मेनन - इट्स नॉट दॅट सिम्पल- पूरब कोहली - आसूर- अर्शद वारसी - हॉस्टेजेस- तिस्का चोप्रा
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3djdMY7