मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड सिनेसृष्टीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. बॉलिवूडमध्ये ज्यांची जे बाहेरून येतात त्यांना आउटसायडर म्हणून पाहिले जाते अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर युझर्स देत आहेत. एवढंच नाही तर अनेकदा त्यांची थट्टाही उडवली जाते. या सगळ्यात दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईने राबिया खान यांनी सुपरस्टार सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. कोणाचीही टेर उडवणं हे हत्येसारखंच- सुशांतच्या आत्महत्येनंतर राबिया यांनी लंडनहून एक व्हिडिओ शेअर केला. यात त्या म्हणतात की, 'माझ्या संवेदना सुशांतसिंहच्या कुटुंबासोबत आहेत. हे हृदय पिळवटून टाकणारं असतं. ही काही मस्करीची गोष्ट नाही. बॉलिवूडला बदलावं लागेल. त्यांना जागावं लागेल. बॉलिवूडला टेर उडवणं पूर्णपणे बंद करावं लागेल. कारण थट्टा उडवणं ही एक प्रकारची हत्या करण्यासारखं आहे.' सलमान करायचे अधिकाऱ्यांना फोन- राबिया यांनी सांगितलं की, 'जे काही होत आहे त्याने मला २०१५ ची आठवण करून दिली. सीबीआय अधिकाऱ्यांना काही पुरावे मिळाले होते यासंबंधी त्यांनी मला लंडनहून भारतात भेटायला बोलावलं होतं. मी त्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले की, त्यांना सलमान खानचा फोन आला होता. तो दररोज फोन करतो आणि पैशांबद्दल बोलतो. तो अधिकाऱ्यांना सागतो की मुलाला काही विचारू नका, त्याची चौकशी करू नका.. मग आम्ही काय करू शकतो.' राबिया यांच्यामते, 'तो अधिकारीही या सर्व गोष्टींमुळे त्रासलेला आणि नाराज दिसत होता. मग मी ही गोष्ट दिल्लीतील उच्चाधिकाऱ्यांपर्यंत नेली. मी याबद्दल तक्रारही केली. पण जर तुम्ही पैशांच्या जोरावर आणि दबाव टाकून तपासावर जाणीवपूर्वक परिणाम करत असाल तर मला माहीत नाही एक नागरिक म्हणून आपण देशाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहोत. मी सर्वांना सांगू इच्छिते की, या विरोधात उभे रहा, आंदोलन करा, लढा आणि बॉलिवूडमधील या वागणूकीला वेळीच थांबवा.' जियाच्या आत्महत्येवर सूरज पांचोलीवर झाले आरोप वयाच्या २५ व्या वर्षी जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली. जुहू येथील तिच्या राहत्या घरी जियाचा मृतदेह सापडला. जियाचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सूरजला तुरुंगातही जावं लागलं होतं. यात सलमान खानने त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ABelzs