मुंबई : 'दिल्ली ६' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिने हिनं पुढे मोजकेच चित्रपट केले. 'ये साली जिंदगी', 'भूमी', 'रॉकस्टार', 'मर्डर ३ असे काही निवडक चित्रपट सोडले, तर ती बॉलिवूडमध्ये फारशी रमलेली दिसली नाही. चित्रपट कमी असले, तरी तिची लोकप्रियता खूप असल्याचं पाहायला मिळतंय. 'दासदेव' या चित्रपटानंतर तिनं दाक्षिणात्य चित्रपटांची वाट धरली होती. अदिती लवकरच एका मल्याळम चित्रपटातही झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, तो व्हायरल होतोय. तो पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. अदितीचा '' हा आगामी सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नारनी पूझा दिग्दर्शित या मल्याळम चित्रपटात अभिनेता जयसूर्या आणि अदिती ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्तानं तिनं मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली ही खरंच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. दाक्षिणात्य चित्रपटात काम करणं हे एक समृद्ध करणारा अनुभव असतो. या चित्रपटातून एक सुंदर प्रेमकथा प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे', असं अदिती म्हणाली. या सिनेमात अदिती काही स्टंट सीन करणार आहे. या भूमिकेसाठी खास जॉर्जियाहून प्रशिक्षक बोलावण्यात आले होते म्हणे. तीन आठवडे तिनं रोप ट्रेनिंगचे धडे गिरवले आहेत. सगळी अॅक्शन दृश्यं अस्सल वाटावीत यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचं समजतंय. तसंच यांच्या ‘ ’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिनं अल्लाऊद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकारली. भूमिका छोटी असूनही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर मात्र, ती जणू इंडस्ट्रीतून गायबच झाली. सध्या तिनं हलक्या-फुलक्या भूमिका नाकारायचा सपाटाच लावला आहे. मोठं बॅनर आणि ए लिस्टर सहकलाकार असतील, तरच आपण चित्रपट करू, असं तिचं म्हणणं असल्याचं कळतंय. ट्रोल्सना म्हणते, 'गेट वेल सून' ! बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर काही ना काही कारणावरुन नेहमी ट्रोल होत असतात. पण हे ट्रोलर्स त्यांना एवढं का बोलतात, या प्रश्नाचं उत्तर अदितीनं दिलं आहे. तिच्या मते ते कुणावरचा तरी राग काढत असतात. म्हणाली, की ' या ट्रोलर्सना त्यांच्या खासगी आयुष्यात काहीतरी अडचणी येतात. त्यामुळं वैतागलेल्या या मंडळींना आपला राग कुणावर तरी काढायचा असतो. मग ते सोशल मीडियावर येतात. ट्रोलिंग हे आजचं वास्तव आहे ज्यापासून आपण कुठेही पळ काढू शकत नाही. त्यामुळं परिस्थिती कशीही असली तरी आपण सकारात्मक असायला पाहिजे असं मला वाटतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Yzabkz