Full Width(True/False)

Jio आणि Airtel चे जबरदस्त प्लान, रोज २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

देशभरात सध्या ३० जून पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन तसेच वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने अनेकांना जास्तीचा डेटा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे तुम्ही जर ग्राहक असाल तर रोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग मिळणाऱ्या या प्लानविषयी जाणून घ्या. रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे डेटा लिमिटचे अनेक प्लान ऑफर केले आहेत. रोज १.५ जीबी डेटा असलेले प्लान खूप प्रसिद्ध आहेत. युजर्संना जास्त डेटा हवा असल्यास त्यांच्यासाठी रोज २ जीबी डेटा प्लान सुद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओ आणि एअरटेलच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लानविषयी माहिती सांगत आहोत, या प्लानमध्ये कॉलिंग सुद्धा दिली जाते. जाणून घ्या या प्लानविषयी....

एअरटेलचा २९८ रुपयांचा प्लान

हा प्लान २ जीबी डेटाचा सर्वात स्वस्त प्लान आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते. थँक्स बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्स्ट्रिम या सारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्लान

हा प्लान २९८ रुपयांच्या प्लानसारखाच आहे. यात वेगळेपण म्हणजे युजर्संना अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप सोबत मिळतो. रोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात युजर्संना एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळतात.

एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा ४४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अन्य प्लानप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते.

एअरटेलचा ६९८ रुपयांचा प्लान

हा प्लान ८४ दिवसाचा आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. या प्रमाणे युजर्संना १६८ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते.

एअरटेलचा २४९८ रुपयांचा प्लान

कंपनीचा हा रोज २ जीबी डेटा देणारा प्लान आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. हा महागडा प्लान आहे. युजर्संना या प्लानमध्ये ७३० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळतात.

रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्लान

जिओचा हा सर्वात स्वस्त २ जीबीचा प्लान आहे. यात ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचा ४४४ रुपयांचा प्लान

जिओचा ४४४ रुपयांचा प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. यात जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचे ५९९ रुपयांचा प्लान

रोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात युजर्संना १६८ जीबी डेटा मिळतो. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तर जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या शिवाय, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्य जिओचा २३९९ रुपयांचा प्लान

एका वर्षाची वैधता असलेला हा प्लान आहे. या प्लानमध्ये ३६५ दिवसांसाठी एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना जिओ ते जिओ नेटवर्वकर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १२ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळतात.

रिलायन्स जिओचा २५९९ रुपयांचा प्लान

हा प्लान २३९९ रुपयांच्या प्लानसारखाच आहे. यात ३६५ दिवसांसाठी ७३० जीबी डेटा आणि १२००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. यात १० जीबी अतिरिक्त डेटा (730GB+ 10GB) मिळतो. तसेच Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3da0bCA