मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बॉलिवूडमधील तसेच त्याच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींना यावर विश्वासच बसत नाहीये. त्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत आहेत. मात्र सुशांतची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अदिती भाटियाने त्यासर्वांवरचा राग व्यक्त केला आहे. 'ये हैं मोहब्बतें' आणि 'टशन-ए-इश्क' या मालिकांमध्ये काम केलं होतं. अदितीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिने सुशांतसिंह राजपूतची एक मुलाखत शेअर केली. या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की त्याचे फक्त दोन मित्र आहेत आणि लोक त्याच्याशी फार बोलत नाहीत. अदितीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुशांत बोलतो की, 'मी नेहमीच माझ्या कामाबद्दलच बोलतो. कारण त्याव्यतिरिक्त मी फार बोरिंग माणूस आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर माझे फक्त दोन मित्र आहेत. असं नाही की मला माणसं आवडत नाहीत पण अनेकदा लोकांना माझ्या गप्पा गोष्टी आवडत नाहीत. कोणाला भेटलो तर मला वाटायचं की त्यांना मी आवडतो आहे. पण त्यानंतर ते माझा फोन उचलणंही बंद करायचे. मला माहितीये की प्रत्येकवेळी आनंदी राहण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.' व्हिडिओमध्ये अदिती भाटिया बोलते की, 'सुशांत राजपूतसोबत जे झालं ते माझ्या डोक्यातून जात नाहीये. आताप्रत्येकजण त्याच्याबद्दल लिहित आहे. हे जग फार निष्ठूर आहे. ते परिस्थिती पाहत नाहीत आणि फक्त पोस्ट शेअर करतात. कमीत कमी जे झालंय त्याची जाणीव तरी ठेवा. सोशल मीडियावर जेव्हा कोणी चांगलं काम करतं ते समोरच्याला आनंदी ठेवण्यासाठी नाही करत. याउलट तो किती चांगला माणूस आहे हे त्याला दाखवायचं असतं. या अशा नवीन जगात आपण जगतोय..' दरम्यान, सुशांतनं आत्महत्येचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात पोलीस आता तपास करणार आहेत. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? याची चौकशी केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं. याशिवाय तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होता असंही त्या अहवालात म्हटलं आहे. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धा हेच याचे कारण आहे? का याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YbB9yz