Full Width(True/False)

TikTok ला टक्कर देतोय भारताचा 'चिंगारी', २५ लाखांहून अधिक डाउनलोड

नवी दिल्लीः शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु, भारतात चीन सीमेवर झालेल्या तणावानंतर चायनीज अॅप्सचा वापर बंद केला जात आहे. या दरम्यान टिकटॉक सारख्या फीचर्स ऑफर करणाऱ्या मेड इन इंडिया अॅप ला खूप मागणी वाढली आहे. या अॅपला २५ लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. युजर्स टिकटॉकला अॅपने रिप्लेस करीत आहे. त्यामुळे हे अॅप ट्रेंडिंग चार्ट्समध्ये पोहोचले आहे. वाचाः TikTok ची देसी चॉईस बनलेल्या या अॅपला छत्तीसगडच्या आयटी प्रोफेशनलसोबत एकत्र येवून ओडिशा आणि कर्नाटकच्या डेव्हलपर्सने तयार केले आहे. भिलाईत राहणाऱ्या चिंगारी अॅपचे चिफ ऑफ प्रोडक्ट सुमीत घोषने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, या अॅपला डेव्हलप करण्यासाठी जवळपास २ वर्षाचा कालावधी लागला. या अॅपला खास करून भारतीय युजर्संच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. वाचाः टॉप चार्ट्समध्ये पोहोचले अॅप चिंगारी अॅपला नोव्हेंबर, २०१८ मध्ये गुगल प्ले स्टोरवर अधिकृतपणे रिलीज करण्यात आले होते. आता भारतात चायनीज प्रोडक्ट्स आणि अॅप्सवर बहिष्कार घालण्याची जोरदार मागणी केली जात आहे. तसेच सोशल मीडियावर सध्या ट्रेंड सुरू आहे. त्यानंतर या अॅप्सची डाउनलोड वेगाने वाढत आहे. सुमीतने सांगितले, आम्हाला भारतीय युजर्संचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या अॅपला २५ लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, हे फ्री अॅप्सच्या टॉप चार्ट मध्ये जागा मिळवण्यात यश मिळवली आहे. वाचाः अनेक भाषेत पर्याय ओडिशाच्या बिश्वात्मा नायक आणि कर्नाटकचे सिद्धार्थ गौतम यांनी या अॅपला डेव्हलप केले आहे. सुमीतने सांगितले, भारतात तयार करण्यात आलेले हे अॅप टिकटॉकला थेट टक्कर देणार आहे. या अॅपमद्ये मिळणारे जबरदस्त फीचर्स शिवाय, अनेक भाषेचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात उडिया, गुजराती, मराठी यासारख्या भाषेचा समावेश आहे. अॅपमध्ये ट्रेंडिंग न्यूज, इंटरटेनमेंट न्यूज, फनी व्हिडिओज, व्हिडिओ साँग आणि लव्ह कोट्स यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. वाचाः अॅपचा इंटरफेस सिंपल चिंगारी अॅपला इन्स्टॉल आणि यूज करुन पाहिले. पहिल्यांदा ओपन करताच अॅप युजर्सला ११ भाषेपैकी कोणती एक भाषा निवडण्याचा ऑप्शन देतो. यात व्हिडिओ, न्यूज, गेम झोन नावाने तीन वेगळे टॅब देण्यात आले आहे. तसेच व्हिडिओ फीड दिसतो. ज्यात विना लॉग इन सुद्धा व्हिडिओज पाहू शकता. राइट स्वाइप केल्यानंतर युजर्संना बाकीचे ऑप्शन मिळतात. तसेच नोंदणी आणि लॉग इन केल्यानंतर युजर्संना रिवॉर्ड्स सुद्धा मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YGu49p