नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता रियलमीने चे नवीन व्हेरियंट बाजारात लाँच केले आहे. कंपनीने नवीन व्हेरियंट संबंधी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कंपनीने जवळपास गेल्या आठवड्यात नार्जो १० ए चे नवीन व्हेरिंयट बाजारात उतरवले आहे. नवीन दॅट ब्लू कलर व्हेरियंटच्या हँडसेसटची फ्लॅश सेल मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचाः Realme Narzo 10 चे वैशिष्ट्ये माहीतीनुसार, टिप्स्टर सुधांशुने रियलमीच्या वेबसाईटवर नवीन कलर व्हेरियंटला सर्वात आधी पाहिले. कंपनीने जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नार्जो १० चे नवीन व्हेरियंट लाँच केले आहे. नवीन कलर शिवाय या व्हेरियंटचे वैशिष्ट्ये, डिझाईन, किंमत आणि फीचर्स रेग्युलर व्हेरियंटचे आहे. नवीन दॅट ब्लू कलर ४ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मध्ये येईल. तसचे याची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या आधी नार्जो १० ला दॅट व्हाईट कलर मध्ये लाँच केले होते. वाचाः कंपनीने खुलासा केला आहे की, नवीन कलर व्हेरियंट ३० जून ला फ्लॅश सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि रियलमच्या वेबसाईटवर होईल. फ्लिपकार्ट वरून फोनला एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर्स सोबत खरेदी करता येऊ शकतो. वाचाः या फोनच्या वैशिष्ट्या संबंधी बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, मीडिया टेक हीलियो जी ८० प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gaYpD9