Full Width(True/False)

चीनी अॅप्सवर बंदी, चायनीज फोन सुरूच राहणार

नवी दिल्लीः शाओमी, ओप्पो, विवो आणि रियलमी यासारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स आधी प्रमाणेच काम करणार आहेत. चायनीज अॅप्स बंद करण्याच्या निर्णयामुळे या फोन्सवर कुठलाच परिणाम होणार नाही. केंद्र सरकारने सोमवारी ५९ चीनी अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. त्यामुळे या अॅप्सनंतर चायनीज फोनवर सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळेल, असे बोलले जात आहे. सध्या भारतात या चिनी कंपन्यांचे मोठे मार्केट भारतात आहे. शाओमीचे दोन अॅप्सचा बंदी घातलेल्या यादीत समावेश आहे. वाचाः चीन आणि भारत यांच्यात सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर चायनीज उत्पादनावर भारतात बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. सरकारने सोमवारी एक निर्णय घेत चीनशी संबंधित Tiktok, CamScanner आणि UCBrowser यासह ५९ अॅप्सवर बंदी घातली आहे. टिकटॉक युजर्संनी यासाठी खरेदी केले होते. या फोनमध्ये चांगले व्हिडिओ बनवता येतात. तसेच यात चांगले फीचर्स असतात. वाचाः फोनवर कोणताही परिणाम नाही केंद्र सरकारकडून चिनी अॅप्सवर बंदी घातली असली तरी याचा परिणाम फोनच्या विक्रीवर होणार नाही. प्रतिस्पर्धी कंपन्याही मानायला तयार आहे की, फोनच्या कंपोनेंट्स चीनहून येतात. सध्या चायनीज फोन्सवर या बंदीचा काहीही परिणाम होणार नाही. ते आधीप्रमाणेच काम करणार आहे. फोनच्या मॅन्यूफॅक्चरिंगचे म्हणणे आहे की, याचा थेट फरक डिव्हाइसच्या फंक्शनॅलिटीवर पडणार नाही. कस्टमर्स नवीन अॅप्सवर सहज स्विच करु शकतील. वाचाः फोनमध्ये नाही मिळणार प्री इन्स्टॉल अॅप्स काउंटरपॉइंटचे रिसर्च डायरेक्टर नील शाह यांनी म्हटले की, यात कोणतीही शंका नाही की, सध्या मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. लोक चायनीज प्रोडक्ट खरेदी करण्याआधी विचार करतील. सध्या सॅमसंग आणि अॅपल यासारख्या नॉन चायनीज ब्रँड्सला आधीच्या तुलनेत जास्त मागणी मिळू शकते. तसेच चायनीज फोन्समध्ये अनेक अॅप्स प्री इन्स्टॉल मिळत होते. आता हा ट्रेंड संपला जाईल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38fg2Pc