नवी दिल्लीः सॅमसंगकडून २०२० स्टँडर्ड आणि लाइफस्टाइल टेलिव्हीजनची मोठी रेंज भारतात लाँच करण्यात आली आहे. सीरीज शिवाय कंपनी 2020 QLED 8K TV फ्लॅगशीप सीरिज घेऊन आली आहे. नवीन रेंज मध्ये अनेक टीव्हीचा समावेश आहे. तसेच सॅमसंगचा सीरीजचे खास होम डेकोर प्रमाणे ठेवण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. रेग्यूलर स्मार्ट टीव्ही पेक्षा ही वेगळी आहे. या टीव्हीचा फील आणि लूक खूप स्टायलिश आहे. वाचाः सॅमसंगच्या टीव्हीला तीन वेगवेगळ्या स्क्रीन साईजमध्ये लाँच करण्यात आले आहे. या टीव्हीला ४३ इंच, ४९ इंच आणि ५५ इंचाच्या मॉडल्समध्ये खरेदी करता येवू शकते. तसेच Samsung QLED8K TVs मध्ये सुपर थिन फॉर्म फॅक्टर शिवाय ८के पिक्चर क्वॉलिटी आणि सराउंड ऑडिओ आऊटपूट देण्यात आले आहे. तसेच या टीव्हीत इनफिनिटी स्क्रीन, Q-Symphony, ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साउंड+ आणि अॅक्टिव व्हाईस अॅम्प्लिफायर यासारखे फीचर्स जबरदस्त साउंड एक्सपिरियन्स देण्यात आले आहे. तसेच QLED 8K TV ला ६५ इंचापासून ८५ इंचापर्यंत स्क्रीन साईज मध्ये बाजारात उतरवले आहे. वाचाः किंमत आणि फीचर्स नवीन स्मार्ट टीव्ही सीरिजमध्ये खूप सारे ओटीटी प्लॅटफॉर्म्सला सपोर्ट करते. यात यूट्यूब पासून झी ५ पर्यंत समावेश आहे. ४३ इंच व्हेरियंटची किंमत ८३ हजार ९०० रुपये आहे. ४९ इंच व्हेरियंटची किंमत १ लाख १६ हजार ९०० रुपये आहे. तर ५५ इंचांच्या टीव्हीची किंमत १ लाख ४८ हजार ९०० रुपये आहे. सध्या याला अॅमेझॉन, सिलेक्टेड सॅमसंग प्लाझा आमि सॅमसंगच्या स्टोरवरून खरेदी करता येवू शकते. ८ जुलै ते १७ जुलै पर्यंत टीव्ही खरेदी केल्यास इंटरोडक्री किंमतीचा फायदा घेता येऊ शकेल. वाचाः फ्लॅगशीप टीव्हीची किंमत सॅमसंग फ्लॅगशीप QLED 8K टीव्हीची ६५ इंचाच्या व्हेरियंटची किंमत ४.९९ लाख रुपये, ७७ इंच व्हेरियंट ९.९९ लाख रुपये, ८२ इंच व्हेरियंटची १४.२९ लाख रुपये आणि ८५ इंच व्हेरियंटची किंमत १५.७५ लाख रुपये आहे. हे स्मार्ट टीव्ही सिलेक्टेड स्टोर्सवरून खरेदी करता येवू शकते. तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असणार आहेत. या टीव्हीच्या खरेदीवर एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि फेडरल बँक कार्ड्सवरून पेमेंट केल्यास १५ हजार रुपयांचा कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3imFBCz