Full Width(True/False)

आत्महत्येपूर्वी सुशांतनं गुगलमध्ये सर्च केलं स्वत:चं नाव ? पण का?

मुंबई:अभिनेता याच्या आत्महत्येविषयी वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू असून त्यात आतापर्यंत २७ व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्याचवेळी शवविच्छेदन अहवालात सुशांतसिंहचा मृत्यू हा गळफास घेतल्यानं झाल्याचं नमूद केलं आहे. सुशांतचा फोन आणि टॅब देखील फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला होता. प्राथमिक अहवलात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुशांतनं गुगलमध्ये स्वत:चं नाव सर्च केल्याचं समोर आलं आहे. १४ जून रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात मृत अवस्थेत आढळला होता. गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं. गेले काही महिने तो डिप्रेशनमध्ये होता असं म्हटलं जात असलं तरी अनेकांनी त्याच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केलाय. त्यामुळं या प्रकरणाचा तपास करण्यात मुंबई पोलिसांकडून सर्व प्रयत्न केले जातआ आहेत. सुशांतच्या फोनमधून काही महत्त्वाचा माहिती मिळवण्यासाठी त्याच्या फोनचा फॉरेन्सिक तपास केला जात आहे. या अहवालात सुशांतनं १४ जून रोजी सकाळी १०.१५ वाजता स्वत:चं () गुगलवर सर्च केलं होतं. त्याच्या संदर्भातील काही बातम्याही त्यानं वाचल्या असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. फॉरेन्सिक विभागाकडून तपास वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांचा जबाब नोंदवून घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, सुशांतच्या घरातून हस्तगत केलेल्या वस्तूंची फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरू आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येसंदर्भात सोशल मीडियावर कोणतीही संभ्रम निर्माण करणारी माहिती न पसरविण्याचेही आवाहन पोलिसांनी केलं आहे. सुशांतसिंह याचा बॉलिवुडमधील बड्या प्रॉडक्शन हाऊससोबत करार झाला होता. तो करार नेमका काय आहे, हे तपासण्यासाठी त्याची प्रत पोलिसांनी मागविली होती. ही प्रत आम्हाला मिळाली असून त्याविषयी तपास सुरू असल्याचंही त्रिमुखे यांनी स्पष्ट केलं. 'सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन' दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचं सोशल मीडीया अकाउंट सुरू ठेवण्याचं तसेच त्याचं पाटण्यातील घर स्मारकामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. याशिवाय सिनेमा, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन' (एसएसआरएफ) स्थापन करण्याचंही राजपूत परिवारने जाहीर केलं आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी अत्यंत भावनात्मक असे जाहीर निवेदन केले आहे. 'तो आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि प्रेरणा होता. त्याच्या अकस्मात आणि अकाली निधनानं आमच्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खात आमची साथ देणाऱ्या सुशांतच्या प्रत्येक चाहत्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दांत त्यांनी सुशांतच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ggToc0