Full Width(True/False)

सॅमसंगच्या या फोनवर जबरदस्त ऑफर, ७०% पर्यंत पैसे मिळणार परत

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत नवीन डिव्हाईस खरेदी केल्यानंतर ७० टक्के किंमत परत मिळण्याची संधी आहे. जो ग्राहक सॅमसंगचा प्रीमियम गॅलेक्सी डिव्हाईस खरेदी करेल त्यांना गॅलेक्सी या ऑफरचा फायदा मिळणार आहे. कंपनी Galaxy S20 सीरीजच्या फोनवर आणि गेल्या वर्षी लाँच लाइड मॉडल्सवर डिस्काउंट ऑफर करीत आहे. वाचाः Samsung Galaxy S20, S20+ आणि S20 Ultra तसेच Galaxy S10 Lite (512 GB) आणि Galaxy Note 10 Lite खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सॅमसंगच्या या ऑफर्सचा फायदा मिळणार आहे. गॅलेक्सी एश्योर्ड ऑफर अंतर्गत तीन महिने जुन्या Galaxy S20 सीरीज स्मार्टफोनसाठी ग्राहकांना ७० टक्के किंमत परत मिळेल. तसेच कंपनी या डिव्हाईसेजवर चांगली ऑफर देत आहे. वाचाः नव्या फोनवर मिळेल बायपॅक व्हॅल्यू सहा महिने जुना फोन झाल्यानंतर या फोनवर ६० टक्के बायपॅक व्हॅल्यू मिळेल. याप्रमाणे डिव्हाईस खरेदीवर नऊ महिन्यानंतर ५० टक्के आणि १२ महिन्यांनंतर ४० टक्के व्हॅल्यू फोनची किंमत मिळवता येऊ शकते. नवीन ऑफर देण्यासाठी सॅमसंगने एक टेक कंपनी Servify सोबत पार्टनरशीप केली आहे. ही कंपनी डिव्हाईस लाईफ सायकल मॅनेजमेंट सर्विसेज युजर्सला देते. कंपनी दुसरे Galaxy Forever ऑफर सुद्धा देते. नवीन ग्राहकांना ही ऑफर आणली आहे. वाचाः ६० टक्के किंमतीत नवीन फोन गॅलेक्सी फॉरएव्हर ऑफ मध्ये ग्राहकांना केवळ ६० टक्के किंमतीत नवीन Galaxy S20 सीरीज डिवाइसमध्ये फोन खेरदी करता येवू शकते. यासाठी कंज्यूमर्सला ६० टक्के किंमत द्यावी लागेल. तसेच उरलेली ४० टक्के रक्कम वर्षभरानंतर द्यावी लागेल. किंवा ग्राहक वर्षभरानंतर ४० टक्के किंमतीच्या जागी आपला फोन परत करु शकतो. या ऑफरचा फायदा मिळवण्यासाठी Galaxy S20 फोन ईएमआय ऑप्शनसोबत खरेदी करता येवू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iseOow