मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन आणि तिची मुलगी यांच्या करोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असून त्यांना नानावटी इस्पितळातून घरी सोडण्यात आले आहे. अभिषेक बच्चनने यासंबंधी ट्वीट करत माहिती दिली. यासोबतच तो आणि वडील अजूनही इस्पितळात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अभिषेकने ऐश्वर्या आणि आराध्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना म्हटलं की, 'तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद. मी नेहमीच तुमचा कृतज्ञ राहीन. ऐश्वर्या आणि आराध्याची करोना टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांना इस्पितळातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. ते आता घरीच राहतील. मी आणि बाबा अजूनही इस्पितळात आहोत आणि देखरेखीखाली आहोत.' काही दिवसांपूर्वी अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. स्वतः अमिताभ आणि अभिषेक यांनी यासंबंधी माहिती सोशल मीडियावर दिली होती. दरम्यान, १७ जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्याला नानावटीमध्ये भरती करण्यात आले होते. तर ११ जुलै रोजू अमिताभ बच्चन आणि करोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं होतं. या दोघांनंतर १२ जुलैला ऐश्वर्या आणि आराध्याचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते.अमिताभ आणि अभिषेक यांना करोना झाल्यावर ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले होते. घरात क्वारंटाइन असताना ऐश्वर्या रायला ताप आला आणि त्यानंतर तिच्यासहीत आराध्यालाही नानावटी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/307TL3H