Full Width(True/False)

आत्महत्येच्या ४ दिवसांपूर्वी सुशांतनं बहिणीला केला होता मेसेज; श्वेतानं शेअर केले स्क्रिनसॉट्स

मुंबई: अभिनेता याच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्याचे कुटुंबिय अद्यापही सावरू शकले नाहीत. त्याची बहिण त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. आज तिनं शेअर केलेल्या पोस्टची चर्चा सुरू असून त्यात आत्महत्येच्या ४ दिवसांपूर्वी सुशांतनं तिला केलेल्या मेसेजचे काही स्क्रिन शॉट्स शेअर केले आहेत. श्वेतानं शेअर केलेल्या या व्हॉट्सअॅप चॅट मध्येही त्याचं एकाकीपण दिसून येत आहे. श्वेता सुशांतला काही दिवसांसाठी अमेरिकेत येऊन राहण्याच्या सल्ला देतेय. तर सुशांतला देखील काही दिवस अमेरिकेत जाण्याची इच्छा होती. सुशांतची बहिणी श्वेतानं त्याला ९ जून रोजी मेसेज केला होता. 'कसा आहेस...लव्ह यू...इथं यायचं आहे का तुला ? तू आणि राणी दीदी दोघंही इथं या', असा मेसेज श्वेतानं सुशांतला केला होता. यावर सुशांतनं दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी 'इच्छा तर खूप आहे', असा रिप्लाय केला होता. त्यानंतर श्वेतानं सुशांतला पुन्हा मेसेज केला होता. ' तर गम एका महिन्यासाठी तू ये इकडं, निवांत वेळ घालवं, बरं वाटेल तुला. मी माझ्या मित्रमैत्रिणींना तू आल्याचंही सागंणार नाही...भेटीगाठी होणार नाहीत. आपण एकत्र चांगला वेळ घालवू', असं तिनं मेसेजमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनीही त्यांचा तपास आणि चौकशी सुरू ठेवली आहे. पोलिसांनी अनेक अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची झाडाझडती सुरू केली असून सुशांतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची आणि मानसोपचार तज्ज्ञांची चौकशी सुरू केली आहे. सुशांत नेमकी कोणती औषधे घेत होता, त्याचा इलाज कसा सुरू होता, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांची कबुली जबाब नोंदवून घेतले आहेत. सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनवर उपचार घेत होता. ज्या मानसोपचार तज्ज्ञांकडं तो उपाचर घेत होता त्यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. या चौकशीतही अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत.एका मानसोपचार तज्ज्ञांनी सुशांतला बायपोलर डिसॉर्डर हा आजार होता, असं सांगितलं आहे तर सुशांतवर उपचार केलेल्या दुसऱ्या एका मानसोपचार तज्ज्ञांनी सुशांतच्या डिप्रेशनचं कारण समोर आलं नसल्याचं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OXTnOu