Full Width(True/False)

लाज वाटायला हवी आपल्याला; केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप

मुंबई: सध्या सोशल मीडियावर केवळ आणि केवळ एका व्यक्तीची चर्चा सुरू आहे. ती व्यक्ती म्हणजे भर उन्हा पावसात रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ खेळत जगण्याची लढाई लढणाऱ्या शांबाबाई पवार नावाच्या आजीबाई. हालाखीच्या परिस्थिकीमुळं त्यांच्यावर भररस्त्यावर लाठी काठी फिरवून गुजराण करण्याची वेळ आली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. त्यांची ही जिद्द पाहून नेते आणि अभिनेत्यांनी देखील त्यांनी मदतीचा हात दिला. अनेक सामाजिक संस्था आणि इतर लोकांनी देखील या आजींच्या घरी जाऊन शक्य ती मदत केली. पण या मदतीचं अनेकांनी प्रदर्शन सुरू केलं. याच गोष्टीवर दिग्दर्शक यांनी राग व्यक्त केला आहे. यांचा एक फोटो शेअर करत केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‪'त्या आजींचा व्हिडिओ गाजतोय. चहूबाजूने मदत जाहीर होतेय. काहीतर लागलीच पोहोचून मदत करतायत. करायलाच हवी. पण त्या मदतीचे व्हिडिओ काढणं आणि आजीला पुन्हा तेच तेच करून दाखवायला लावणं. किती संयुक्तीक आहे? लाज वाटायला हवी आपल्याला', असं म्हणत केदार शिंदे यांनी संताप व्यक्त केलाय. शांताबाई पवार असं या आजींचं नाव आहे. हा हडपसर येथे राहतात. त्यांच्या मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नातवांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. काबाड कष्ट करून त्यां नातवांचा सांभाळ करत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचे संकट आहे. लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्या या कुटुंबाची उपासमारी सुरू आहे. शेवटी लॉकडाऊन उठल्यावर न खचता पदर खोचून आजी पुन्हा उभ्या राहिल्या. रस्त्यावर काठी फिरवण्याची कला सादर करण्यास सुरुवात. अनेकांनी या आजीला सोशल मीडियावर व्हायरल केल्याने अवघ्या दोन तीन दिवसातच त्या सोशल मीडियावर स्टार झाल्या. अगदी अभिनेते आणि अधिकाऱ्यांनीही त्यांची स्तुती करत त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. काही संस्थांनीही आजींना मदतीचा हात दिला आहे. आजींनी मानले आभार सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात मिळालेल्या कौतुकानं आजी भारावून गेल्या आहेत. 'करोनाच्या संकटात बाहेर पडू नको असं सगळे मला सांगत होते पण मला माझी लेकर जगवायची होती. मला बाहेर पडणं भागचं होतं. मी बाहेर पडले आणि माझ्या केसालाही धक्का लागला नाहीये. माझा व्हिडिओ सगळीकडे पोहोचला आणि माझे मदतीसाठी अनेक जण पुढे आले. ज्यांनी मला मदत केली त्यांचे मी आभार मानते,' असं त्यांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hItAqe