मुंबई: '' आणि '' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हिनं शेअर केलेल्या एका फोटोची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अभिज्ञानं एका खास व्यक्तीचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. अभिज्ञानं सोबत फोटो शेअर करत प्रेमात असल्याचं सांगितलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिज्ञा आणि मेहूल रिलेशनशिपमध्ये आहेत. परंतु अभिज्ञानं यावर मौन पाळलं होतं. हा फोटो शेअर करत अभिज्ञानं चाहत्यांना एक गोड सरप्राइज दिलं असंच म्हणावं लागेल. खरं तर सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अभिज्ञा एयर होस्टेस होती हे तर सर्वांनाच माहित आहे, पण यापूर्वी तिचं लग्न झाल्याचं खूपच कमी जणांना माहित आहे. २०१४ साली अभिज्ञा वरुण वैटिकरसोबत विवाहबंधनात अडकली होती. मात्र, काही कारणांमुळं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, विणकाम, रंगवलेल्या जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या, जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या कलाकृती, चित्रं अशा विविध कलाकृती सध्या अभिज्ञा भावेच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर झळकत आहेत. पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणारा वस्तूंचा पुनर्वापर यातून पाहायला मिळतोय. स्वत:चा छंदही ती जोपासते आहे. आधीपासूनच या गोष्टींची आवड असलेली अभिज्ञा, आता हातात पुरेसा वेळ मिळाल्यानं विविध कलाकृती करतेय. प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून त्यावर नक्षीकाम करून फुलदाणी बनवणं, जुन्या कपड्याचा वापर करत वॉल हँगिंग, बास्केट बनवणं अशा टाकाऊतून टिकाऊ कलाकृती ती साकारतेय. अगदी उशांची कव्हर्स, चादरीवर विणकाम करून करून ती आकर्षक बनवते आहे. संपूर्ण घराची सजावट करताना जुनी, फिकट रंग झालेली दारं-खिडक्या, टेबल्स या प्रत्येक गोष्टीला काही ना काही कलात्मक रूप देण्याचे तिचे प्रयत्न सुरू असतात. विविध कलाकृतींसाठी लागणाऱ्या रंगांपासून, लोकर, रंगीत दोरे, ग्लू गन अशा लहान-सहान गोष्टींचा साठा तिच्याकडे कायम असतो. याचा पुरेपूर वापर तिनं लॉकडाउनच्या काळात केला. घरात येणाऱ्या सामानाच्या पॅकिंगचे खोके, कार्डबोर्ड अशा लहानसहान टाकाऊ गोष्टींतून जिथे-जिथे कलात्मक निर्मिती करणं शक्य आहे, अशा प्रत्येक गोष्टी ती सांभाळून ठेवते. या सगळ्या कलात्मक छंदाबरोबरच कॅलिग्राफी शिकण्याची तिची इच्छा आहे. कॅलिग्राफी हीदेखील एक कला असल्यानं त्याचा वापर घराच्या सजावटीमध्ये कलात्मकरित्या करता यावा यासाठी लवकरच ती कॅलिग्राफी शिकणार आहे. तिच्या या संपूर्ण आर्टवर्कला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ती करत असलेल्या कलाकृतींचे ट्यूटर व्हिडीओ बनवण्याची मागणी चाहत्यांकडून होत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2D9SShM