Full Width(True/False)

आसुसचा जबरदस्त फोन लाँच, किंमतीपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

Asus चा नवीन स्मार्टफोन आला आहे. Asus ROG Phone 3 ला कंपनीने लाँच केले आहे. एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये लाँच केलेला Asus ROG फोन गेमिंग फोन चाहत्यांसाठी खास आहे. आसुस ROG सीरीज हा तिसरा फोन आहे. ROG Phone 3 आता पर्यंत सर्वात पॉवरफुल ROG फोन आहे. हा जगातील पहिला फोन आहे ज्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर दिला आहे. हा क्वॉलकॉमचे लेटेस्ट प्रोसेसर आहे. आतापर्यंत कोणताही फोन या प्रोसेसरने लाँच करण्यात आला नाही. Asus ROG Phone 3 च्या फोनची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. आसुसच्या या फोनमध्ये दमदार आणि लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहे. आसुसच्या या फोनमध्ये सुपरचार्ज्ड विजुअल्स आणि एडवांस्ड कॅमेरा कॅपबिलिटीज सोबत येतो. हा फोन जबरदस्त गेमिंगचा अनुभव देणारा आहे.

Asus ROG Phone 3 चा सेल ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्टवरून सुरू होणार आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची ही किंमत आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५७ हजार ९९९ रुपये आहे. जर अॅक्सेसरीजची प्राईस पाहिली तर ROG Phone 3 ग्लास स्क्रीन प्रोटेक्टर ची किंमत ६९९ रुपये आहे. तसेच नियॉन एरो केस ची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. AeroActive कूलर 3 ची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे.

Asus ने या स्मार्टफोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात पॉवरफुल प्रोसेसर आहे. हा आपल्या प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८६५ पासून १० पट जास्त वेगवान आहे. आसुसया या फोन मध्ये Adreno 650 GPU देण्यात आले आहे. हा फोन 5G कनेक्टिविटीसोबत येतो. या फोनला खास इन इयर गेमिंग हेडफोन सोबत लाँच करण्यात आले आहे. आसुस रोग फोन ३ ला ट्रान्सपेरेंट बॅक पॅनेल सोबत लाँच करण्यात आले आहे. जुन्या मॉडल बॅक पॅनेल ट्रान्सपेरेंट नाही. केवळ अर्ध्या भागात ट्रान्सपॅरेंट आहे. म्हणजेच तुम्ही बॅक पॅनेलच्या आत पाहू शकता येते.

आसुसच्या या फोनमध्ये रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकला मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा SONY IMX686 सेंसर दिला आहे. तसेच या फोनमध्ये मागच्या बाजुला १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला २४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. इंटेस गेमिंग दरम्यान जबरदस्त इंटरनेट स्पीडसाठी आसुस रोग फोन ३ वर मोबाइल डेटा आणि वाय फाय ची स्पीड ला कंबाइन केले जावू शकते. यामुळे युजर्संना जास्त स्मूद गेमिंगचा आनंद मिळू शकतो.

Asus ROG Phone 3 मध्ये 6000 mAh ची बॅटरी दिली आहे. फोनला 30W फास्ट चार्जिंगचा ऑप्शन दिला आहे. तसेच एक आणखी फीचर्स दिले आहेत. फोनची चार्जिंगला कस्टमाइज करू शकते. त्यामुळे चार्जिंग आणि फास्ट चार्जिंग दोन्ही ऑप्शन मिळतात. ROG Phone 3 ला 144Hz रिफ्रेश रेट च्या AMOLED डिस्प्ले सोबत लाँच करण्यात आले आहे. फोनमध्ये ६.५९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटचे डिस्प्ले लाँच करण्यात आले आहे. आसुस रोग फोन 3 ला 6X लार्ज हीट सिंक सोबत लाँच केले आहे. गेमिंग दरम्यान फोन ओव्हरहीट होऊ नये यासाठी फोनमध्ये GameCool 3 कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hqmaYn