Full Width(True/False)

तब्बल ५४ लोकांच्या संपर्कात आलं बच्चन कुटुंबिय

मुंबई- सध्या बच्चन कुटुंबियांवर करोनाने विळखा घातला आहे. पाच लोकांच्या कुटुंबात चारजणांना करोनाची लागण झाली आहे. अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून जया यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. अमिताभ आणि अभिषेक शनिवार रात्रीपासून नानावटी इस्पितळात भरती आहेत. सध्या बच्चन कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची करोना चाचणी करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएमसीने बच्चन यांच्या घरी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. यात एकूण ५४ लोकांचा समावेश आहे. यांपैकी २८ लोकांची चाचणी करण्यात आली असून उर्वरित लोकांचीही लवकरात लवकर चाचणी होणार आहे. २८ लोकांचे रिपोर्ट सोमवारी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. रविवारी सकाळी अमिताब यांचा जलसा बंगला पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात आला. फक्त जलसा बंगलाच नाही तर त्यांचा प्रतीक्षा आणि जनक हे दोन बंगलेही सॅनिटाइज करण्यात येणार आहेत. आता अभिषेक आणि अमिताभ यांच्याप्रमाणेच ऐश्वर्या आणि आराध्यालाही इस्पितळात भरती करणार की त्यांना होम क्वारन्टिन करणार याबद्दल माहिती मिळाली नाही. पहिलं अमिताभ यांना झाली करोनाची लागण- शनिवारी रात्री यांनी ट्विटरवरून त्यांना करोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. यानंतर काही वेळात बिग बींचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. या सगळ्यात कुटुंबातील इतर व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याचं बोललं जात होतं. मात्र रविवारी दुपारी ऐश्वर्या आणि आराध्याच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं राजेश टोपे यांनी ट्वीट करत सांगितलं. दरम्यान, कोलकत्तामध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी पूजा आणि यज्ञ केला जात आहे. कोलकत्तातील श्यामबाजार येथे राहणाऱ्या लोकांनी बिग बींसाठी शिव मंदिरात यज्ञ केला. याशिवाय ऑल सेलिब्रिटी फ्रेण्ड्स क्लबच्या सदस्यांनी बेहाला येथील परिसरात पूजेचं आयोजन केलं होतं. शनिवारी संध्याकाळी हलकासा ताप आल्यामुळे अमिताभ बच्चन चेकअप करण्यासाठी नानावटी इस्पितळात गेले होते. तिथे करोनाची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. अमिताभ यांच्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांच्याही टेस्ट झाल्या. यात फक्त जया यांची टेस्ट निगेटिव्ह आली. बाकी चारजणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Wa4B6P