मुंबई- अभिनेता रंजन सहगलचं वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालं. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक अवयव निकामी झाल्यामुळे रंजनचा मृत्यू झाला. रंजनने रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय- बच्चन यांच्या '' सिनेमात काम केलं होतं. याशिवाय त्याने अनेक पंजाबी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. रंजनने २०१७ मध्ये आलेल्या 'माही एनआरआय' आणि २०१४ मध्ये आलेल्या 'यारां दा कैचअप' या सिनेमांमध्ये काम केलं होतं. रंजन मुळचा पंजाबी असून चंदीगढ येथील राहणारा होता. पंजाब यूनिर्व्हसिटीमधून त्याने थिएटर स्टडीजमध्ये मास्टर डिग्री घेतली होती. यानंतर तो मुंबईत करिअर घडवण्यासाठी आला. यावेळी त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. 'रिश्तों से बड़ी प्रथा', 'तुम देना साथ मेरा', 'क्राइम पेट्रोल', '' या त्याच्या मालिका विशेष गाजल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून रंजन आजारी होता. २०१४ मध्ये त्याने वेशभूषाकार निव्या छाबडाशी लग्न केलं होतं. रंजनचं असं आकस्मित जाणं त्याच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का देऊन गेलं. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी आणि त्याच्या चाहत्यांनी रंजन सेहगलला श्रद्धांजली वाहिली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZmK3K0