Full Width(True/False)

मी सुशांतवर कोणतेही आरोप केले नव्हते; पोलीस चौकशीत संजनाचा खुलासा

मुंबई: अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात २७ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटातील त्याची सहकलाकार हिची देखील पोलिसांनी चौकशी केली.काल म्हणजेच मंगळवारी संजना तिचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलिस ठाण्यात आली होती. तिची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. सुशांतवर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये आला होता. त्याला त्याची प्रतिमा खराब करण्यासाठी कोण तरी प्रयत्न करतंय अशी सतत भीती असायची. या अनुशंगानं संजनाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या शेवटच्या दिवसातील वागणं किंवा त्याच्या वागण्यात झालेला काही बदल याबद्दलही तिला प्रश्न विचारण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे या दोघांचा 'दिल बेचारा' हा चित्रपट २४ तारखेला प्रदर्शित होत आहे. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी टू या मोहिमेअंतर्गत सुशांतनं संजनासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या संदर्भातही तिला सखोल विचारण्यात आलं.मी सुशांतवर कधीही कोणतेही आरोप नव्हते, असं संजनानं पोलिसांना सांगितलं आहे. यासंदर्भात दोघांचे पर्सनल चॅट देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले असल्याची माहिती पोलिसांना दिली. २०१८मध्ये संजनानं दिल बेचारा या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. त्यानंतर दिग्दर्शक मुकेश छाबडा यानं तिची निवड झाल्याचं सांगितलं होतं. चित्रपटाच्या सेटवर सुशांतला पहिल्यांदा भेटल्याचं संजनानं पोलिसांनी सांगितलं. मी सुशांतवर #MeToo अंतर्गत कोणतेही आरोप केले नव्हेत. सुशांतवर हे आरोप केले तेव्हा मी अमेरित होते, असं संजनानं पोलिस चौकशीत म्हटलं आहे. माझ्या नावानं फेक अकाउंट बनवत मी सुशांतवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप व्हायरल करण्यात आले होते. याबद्दल मला समजलं तेव्हा मी आमच्या दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केले होते. सुशांत माझ्याशी कधीही चुकीचं वागला नव्हा', हे संजनानं पोलिसांसमोर स्पष्ट केलं आहे.कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा या चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारआहे. 'सेटवर असं काहीच घडले नव्हतं,' असं म्हणत त्याने सुशांत सिंग राजपूतला पाठिंबा दर्शविला होता. दरम्यान, मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, त्यांची पुन्हा जबाब नोंदणी कशासंदर्भात केली जाणार आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YL38p8