चैन्नई- दाक्षिणात्य अभिनेत्री विजयलक्ष्मीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिला तातडीने इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. 'फ्रेंड्स' आणि 'बॉस एंगीरा भास्करन' या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तमिळ राजकीय नेता सीमनच्या विरोधात बोलत होती. असं म्हटलं जातं की तिला एका खासगी इस्पितळात भरती करण्यात आलं असून ती उपचारांना प्रतिसादही देत आहे. विजयलक्ष्मीने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने आणि त्याच्या पक्षाच्या लोकांनी कशाप्रकारे तिला त्रास दिला आहे हे स्पष्टपणे सांगितलं. यात ती म्हणाली की, 'हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे आणि गेल्या चार महिन्यांपासून सीमन आणि त्याच्या पक्षाच्या लोकांमुळे प्रचंड तणावात आहे. आई आणि बहिणीसाठी जीवंत राहण्याचा मी प्रयत्न केला. पण हरिनादर येथे मीडियाने माझा अपमान केला. मीआधीच बीपीच्या काही गोळ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे काहीवेळात माझं बीपी कमी होईल आणि काही तासांमध्ये माझा मृत्यू होईल.' या व्हिडिओमध्ये पुढे म्हणाली की, 'हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या चाहत्यांना मी सांगू इच्छिते की, माझा कर्नाटकात जन्म झाल्यामुळे सीमन मला त्रास देत आहे. एक स्त्री या नात्याने मी सर्वोतोपरी लढण्याचा प्रयत्न केला. पण आता हा दबाव मला सहन होत नाही. मी पिल्लई कम्युनिटीची आहे. एलटीटीईचा नेता प्रभाकरणही याच कम्युनिटीचा होता. आज सीमन जो काही आहे तो फक्त प्रभाकरणमुळेच आहे. पण सध्या तो सतत मला त्रास देत आहे.' व्हिडिओत विजयलक्ष्मीने आरोप केले की, 'तू माझ्या चरित्रावर प्रश्न उपस्थित केले. हीच गोष्ट फार त्रास देणारी आहे. या सर्व गोष्टींचा सामना केल्यानंतर मी आता हे पाऊल उचलत आहे. मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की सीमनला सोडू नका. त्याला जामिन मिळायला नको. माझा मृत्यू सर्वांसाठी अंजन घालणारा असायला हवा. मला कोणाचीही गुलाम होऊन जगायचं नाहीये.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39wr8QL