Full Width(True/False)

लॉकडाउनमुळे बेरोजगार डब्बेवाले, मदतीला धावले अभिनेते

मुंबई- मुंबईच्या डब्बेवाल्यांची ओळख फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रापुरतीच मर्यादीत नाही. जगभरात मुंबईच्या डब्बेवाल्यांची ओळख आहे. स्वतःचं वेगळं अस्थित्व असणाऱ्या डब्बेवाल्यांना गेल्या चार महिन्यापासून कठीण काळ सोसावा लागत आहे. लॉकडाउनमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. आता त्यांच्या मदतीसाठी अभिनेता आणि धावून आले आहेत. फक्त सुनील आणि संजयच नाही तर नेते अस्लम शेख यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. स्वतः सुनील शेट्टीने या सर्व कामाची पहिल्यांदा सुरुवात केली. याबद्दल सुनीलने संजय आणि अस्लमशी चर्चा केली. दोघांनीही मदत करण्याची तयारी दाखवल्यानंतर तिघांनी मिळून मुंबईच्या डब्बेवाल्यांवर आलेलं संकट कमी- जास्त प्रमाणात दूर करण्याचा निश्चर्य केला. मार्च महिन्यापासून मुंबईच्या डब्बेवाल्यांची सेवा लॉकडाउनमुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरांमध्ये लोकांपर्यंत जेवण पोहोचवणाऱ्या या लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या डबेवाल्यांच्या जेवणाची सोय सुनीलने केली आहे. पुण्यात त्यांच्यासाठीच्या जेवणाचे अनेक ट्रक पोहोचले. स्थानिक एनजीओच्या मदतीने सुनीलने डब्बेवाल्यांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे काम केले. याबद्दल अधिक माहिती देताना अस्लम शेख म्हणाले की, 'डब्बेवाले हे मुंबईची दुसरी लाइफलाइन आहे. या महामारीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. डब्बेवाले दुसरा कोणत्याही व्यवसायाची निवड करू शकले असते पण त्यांनी लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. समाजात अजूनही माणूसकी शिल्लक आहे हे यांच्याकडे पाहून कळतं. या कठीण काळात ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशात त्यांना मदत करणं हे आपलंही कर्तव्य आहे.' तसेच संजय दत्त म्हणाला की, 'हा समूदाय संपूर्ण मुंबईचे पोट भरतो. पण आज त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. याचसाठी त्यांना आम्ही प्रेमाने जेवण देत आहोत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WlyyAW