Full Width(True/False)

काळजाचा तुकडा घेऊन गेलास; सुशांतसाठी क्रितीची भावुक पोस्ट

मुंबई: अभिनेता आता या जगात नाहीए. त्याच्या या अकाली एक्झिटमुळं अनेकांना धक्का बसला आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही त्याच्या निधनाच्या धक्क्यातून सावरली नाहीए. तर अभिनेत्री ही देखील सुशांतच्या निधनाची बातमी आल्यापासून गप्प होती. अखेर तिनं तिच्या भावनांना सोशल मीडियावर वाट मोकळी करत सुशांतबद्दल भावना व्यक्त केल्यात. क्रितीनं सुशांतसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिनं सुशांतसाठी भावुक मेसेज लिहिलाय. सुश..मला माहित आहे की, तुझं मन, तुझे विचार तुझे सर्वांत चांगले मित्र आणि सर्वांत मोठा शत्रूही तेच होते. तुला जगण्यापेक्षा मरणं सोप्प वाटलं, या विचारानं आज मी पूर्णपणे कोसळले आहे. त्या क्षणी तुझ्या आजूबाजूला काही जण हवे होते.. जे त्या क्षणी तुला यातून बाहेर काढू शकले असते. काश..तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना तू हा धक्का दिला नसता. काश..तुझ्या मनातली घालमेल मला समजून घेता आली असती...आता हे शक्य नाही...अशा अनेक गोष्टी आहेत... माझ्या काळजाचा एक तुकडा तुझ्या सोबत आहे....आणि तू नेहमीच माझ्यासोबत राहणार आहेस. नेहमीच तुझ्यासाठी प्रार्थना करत होते...आणि यापुढंही करेन...'असं क्रितीनं लिहिलं आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर क्रितीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर न केल्यामुळं सुशांतच्या चाहत्यांनी तिच्यावर टीका केली होती. 'तू किती निर्दयी आहेस एक पोस्ट देखील शेअर करू शकत नाहीस. तुझं दगडाचं काळीज आहे', अशा प्रकारचे मेसेज नेटकऱ्यांनी क्रितीच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. गेल्या काही महिन्यांपासून सुशांतचं नाव रिया चक्रवर्ती हिच्यासोबत जोडण्यात येत होतं. परंतु सुशांतच्या आत्महत्येवर तिनं अद्यापही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. रियापूर्वी सुशांतचं नाव अभिनेत्री क्रिती सॅनन हिच्यासोबत जोडण्यात आलं होतं. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नव्हता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YEj1fL