Full Width(True/False)

बिग बींसाठी हॉस्पिटल बाहेर चाहत्यांची गर्दी, पोलीस सुरक्षा वाढवली

मुंबई- महानायक आणि अभिषेक बच्चनसह आता ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चन पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. दरम्यान अभिषेक आणि अमिताभ यांना नानावटीमध्ये भरती करण्यात आलं आहे. यात अमिताभ यांच्या घराजवळील संरक्षणही वाढवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ यांच्या जुहू येथील दोन्ही बंगल्याच्या बाहेर अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. बिग बी असल्याचं कळल्यानंतर अनेक चाहते इस्पितळाच्या बाहेर जमा होऊ लागले आहेत. मात्र त्यांना तिथून हटवण्यात येत आहे. नानावटी इस्पितळात बिग बींवर उपचार सुरू आहेत सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती देताना म्हटलं की, 'इस्पितळाच्या बाहेर लोकांची गर्दी होऊ नये यासाठी तिथे आवश्यकतेपेक्षा जास्त पोलीस सुरक्षा दिली आहे. कारण इस्पितळात अजूनही रुग्ण आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. आमचे अधिकारी इस्पितळाच्या बाहेर उभे असून कोणालाही तिथे गर्दी करू दिली जात नाहीये.' याशिवाय जुहू पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनीही अमिताभ यांच्या सर्व बंगल्यांच्या बाहेर कडक सुरक्षा ठेवण्यात आल्याची माहिती दिली. अमिताभ बच्चन यांच्यासाठी देशभरात पूजा आणि यज्ञ दरम्यान, कोलकत्तामध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी पूजा आणि यज्ञ केला जात आहे. कोलकत्तातील श्यामबाजार येथे राहणाऱ्या लोकांनी बिग बींसाठी शिव मंदिरात यज्ञ केला. याशिवाय ऑल सेलिब्रिटी फ्रेण्ड्स क्लबच्या सदस्यांनी बेहाला येथील परिसरात पूजेचं आयोजन केलं होतं. शनिवारी संध्याकाळी हलकासा ताप आल्यामुळे अमिताभ बच्चन चेकअप करण्यासाठी नानावटी इस्पितळात गेले होते. तिथे करोनाची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. अमिताभ यांच्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांच्याही टेस्ट झाल्या. यात फक्त जया यांची टेस्ट निगेटिव्ह आली. बाकी चारजणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Wb9hsO