नवी दिल्लीः चा आज पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जर तुम्हाला तुम्हाला रेडमीचा हा प्रसिद्ध स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज चांगली संधी आहे. आज दुपारी १२ वाजता आयोजित होणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये अॅमेझॉन इंडिया आणि मी डॉट कॉम वर फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मध्ये क्वॉड रियर कॅमेरा आणि ६.६७ इंचाची स्क्रीन ही या फोनची खास वैशिष्ट्ये आहेत. वाचाः Redmi Note 9 Pro ची किंमत व ऑफर रेडमी नोट ९ प्रोचा ४ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. रेडमी नोट ९ प्रो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एअरटेलकडून डबल डेटा ऑफर केली जात आहे. म्हणजेच २९८ रुपये आणि ३९८ रुपयांच्या रिचार्जवर डबल डेटा मिळणार आहे. स्मार्टफोन इंटरस्टेलर ब्लॅक, ऑरोरा ब्लू आणि ग्लेशियर व्हॉईट या कलरमध्ये मिळेल. वाचाः रेडमी नोट ९ प्रोची वैशिष्ट्ये Redmi Note 9 Pro मध्ये ६.६७ इंचाचा एचडी प्लस फुल स्क्रीन डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनची डेनसिटी ४०० पीपीआय आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम हे दोन पर्याय मिळतात. स्मार्टफोनला ६४ जीबी व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडीकार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. रेडमी नोट ९ प्रो ला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 5020mAh ची बॅटरी दिली आहे. बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये साईडला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी रेडमी नोट ९ मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2O0uhhD