Full Width(True/False)

'तीनही खान गप्प का', सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

पटणा- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर आता राजकीय वर्तुळातही चर्चा होऊ लागली आहे. भाजप नेता यांनी सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक ट्वीट केले. सुशांतल्या न्याय मिळवून देण्यासाठी आता स्वामींनी पुढाकार घेतला आहे. सुशांतच्या चाहत्यांप्रमाणे स्वामींनीही या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांनी ट्वीट करून तीनही खानांवर निशाणा साधला आहे. स्वामींच्या निशाण्यावर बॉलिवूडचे तीन खान सुब्रमण्यम स्वामी यांनी सोशल मीडियावर एक ट्वीट करत बॉलिवूडचे तीन खान अर्थात , आणि यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामी यांनी ट्वीट करत 'यावेळी बॉलिवूडचे बाहुबली शाहरुख, आमिर आणि सलमान सुशांतच्या आत्महत्येवर शांत का आहेत? ते काही बोलत का नाहीत?' असा प्रश्न विचारला. लोकांच्यामते, सुशांतची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे. तो घराणेशाहीचा शिकार झाला होता. याचमुळे सुशांत आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी अनेकांनी केली. सुब्रमण्यम स्वामी यांच्या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, जेव्हा संजय दत्तला तुरुंगवास झाला होता तेव्हा संपूर्ण बॉलिवूड त्याच्या समर्थनात उतरलं होतं. पण सुशांतच्या निधनावेळी असं होताना दिसत नाही. काहींनी यावेळी अक्षय कुमारलाही टार्गेट केलं. अक्षयचे सिनेमे बॉयकॉट करण्याचीही काहींनी सोशल मीडियावर मागणी केली. सीबीआय चौकशी करण्यास स्वामी करणार का मदत- काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामींनी ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली होती. त्यांनी सुशांत प्रकरणी एका वकिलाची नियुक्ती केली आहे आणि त्या वकिलाला आवश्यक ती सर्व कागदपत्र गोळा करण्यास सांगितले आहे. तसेच गरज पडली तर या प्रकरणी सीबीआय चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले. सुब्रमण्यम स्वामींना याप्रकरणी भरपूर पाठिंबा मिळत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2W4IHle