Full Width(True/False)

नागराज मंजुळेचे 'हे' तीन लघुपट पाहाता येणार ओटीटीवर

मुंबई टाइम्स टीम सिनेमागृहं उघडली नसल्यानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची रांग लागली. नवेकोरे चित्रपट ओटीटीवर येऊ लागले. तसंच आता वेगवेगळे लघुपटदेखील ओटीटीवर येऊ लागले आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक यानं तयार केलेले तीन बुधवारी ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. नागराजनं स्वतः दिग्दर्शित केलेला '' आणि प्रस्तुत केलेला '', '' हे लघुपट पाहायला मिळणार आहेत. हे सगळे लघुपट राष्ट्रीय स्तरावर गाजलेले आहेत. 'बिबट्या' आणि 'पायपीट' या लघुपटांचं दिग्दर्शन अनुक्रमे गार्गी कुलकर्णी, मिथुनचंद्र चौधरी यांनी केलं आहे. आपल्या लघुपटाविषयी बोलताना नागराज सांगतो की, 'या तीनही लघुपटांमध्ये एक अनोखी कथा दडलेली आहे; जी प्रामुख्यानं माझ्या मनाला भिडली आहे. मला आशा आहे की, ही गोष्ट प्रेक्षकांना नक्की आवडेल. 'फॅन्ड्री' चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना पावसामुळे आम्हाला अनेकदा शूट अर्ध्यावर थांबवायला लागलं होतं. याच पावसाच्या ब्रेकमध्ये मला माझ्या पावसाच्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या. ज्यातून माझ्या 'पावसाचा निबंध' या लघुपटाची कथा आकाराला आली.' आज, १५ जुलैला 'पावसाचा निबंध', 'बिबट्या' आणि 'पायवाट' या मराठी लघुपटांचा प्रीमियर 'झी५' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला आहे. येत्या काही दिवसांत आणखीही काही दर्जेदार लघुपटांचं प्रदर्शन ओटीटीवर होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे प्रेक्षकांना येत्या काळात दर्जेदार लघुपटांची मेजवानी मिळू शकेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OoqlY3