Full Width(True/False)

'माझा होशील ना' मालिकेच्या शूटिंगला पुन्हा ब्रेक

कल्पेशराज कुबल सरकारनं आखून दिलेल्या नियमांनुसार ठाण्यामध्ये अलीकडेच चित्रीकरण सुरू झालं होतं. येत्या काही दिवसांत आणखी काही मालिकांच्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार होता. पण, पुढचे दहा दिवस ठाण्यात जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे शूटिंगला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार चिंतेत आहेत. मालिकांचं शूटिंग इनडोअर होणार असून, सर्वांची व्यवस्था सेटवर करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनानं चित्रीकरणास परवानगी द्यावी, अशी विनंती निर्मात्यांकडून केली जात आहे. राज्य सरकारनं आखून दिलेल्या नियमांची पूर्तता करुनच टीव्ही मालिकांनी चित्रीकरणाची रीतसर परवानगी मिळवली होती. 'आई कुठे काय करते', 'मोलकरीण बाई', '' या मालिकांच्या चित्रीकरणाला चार दिवसांपासून सुरुवात झाली होती. येत्या काही दिवसांत 'हे मन बावरे', 'आनंदी हे जग सारे', 'ह.म. बने तु. म. बने' मालिकांचं चित्रीकरण सुरू होणार होतं. परंतु, आता पुन्हा ठाणे परिसरात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे चित्रीकरण थांबलंय. परंतु, गुरुवारचं चित्रीकरण रद्द करण्यात आलं. बाहेरुन आलेले कलाकार १४ दिवस क्वारंटाइन झाल्यावर सेटवर आले होते. मालिकांचं चित्रीकरण सुरू असताना किचनपासून सगळी व्यवस्था सेटवर करण्यात आली आहे. सेटवर पुरेशी काळजी घेतली जात असेल, तर मालिकांचं चित्रीकरण करायला काय हरकत आहे? असा सवाल मालिका निर्माते, दिग्दर्शकांकडून विचारला जातोय. चित्रीकरणासाठी आखून दिलेल्या नियमांचं आणि अटींचं पालन आम्ही करत आहोत. चित्रीकरणाशी निगडित केवळ कलाकार आणि तंत्रज्ञच सेटवर उपस्थित आहेत. त्यांचा बाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीशी थेट संपर्क होत नाही. या व्यतिरिक्त स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुरक्षिततेच्या ज्या सूचना करतील त्यांचं पालन आम्ही करण्यास तयार आहोत. परंतु, चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली तर कलाकार-तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. - सुबोध खानोलकर, निर्माते (माझा होशील ना) ठाण्यात दहा दिवसांच्या अंशत: लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असून, सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे. सार्वजनिक ठिकाणीही सुरक्षित वावराचे नियम पाळण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांच्या आवारामध्ये शूटिंगवर निर्बंध आहेत. संचारबंदी आणि जमावबंदीचेही आदेश आहेत. शूटिंग करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची स्वतंत्र नोटीस नसली, तरी लॉकडाउनची बंधनं सर्वांसाठी सारखीच आहेत. त्याचं उल्लंघन होऊ देऊ नये. -संदीप माळवी, उपायुक्त ठाणे महापालिका


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dXoQuc