Full Width(True/False)

६९ रुपयांत फ्री कॉल आणि 7GB डेटा, जबरदस्त प्लान

नवी दिल्लीः आपल्या युजर्संसाठी लागोपाठ नवीन नवीन प्लान घेऊन येत आहे. नवीन प्लान्समध्ये युजर्संना जास्तीत जास्त डेटा आणि फ्री कॉलिंगचा फायदा दिला जात आहे. युजर्संसाठी सुद्धा कंपनी अनेक जबरदस्त प्लान घेऊन आली आहे. आम्ही तुम्हाला जिओफोनचे दोन जबरदस्त आणि स्वस्तातील प्लानसंबंधी सांगणार आहोत. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा सुद्धा मिळतो. जाणून घ्या जिओफोनच्या या दोन प्लानमध्ये काय-काय फायदा मिळतो. वाचाः ६९ रुपयांचा प्लान, फ्री कॉलिंग आणि 7GB डेटा जिओचा ६९ रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना ७ जीबी डेटा मिळतो. जिओ फोनच्या या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे. प्लानमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग एकदम फ्री आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये २५० नॉन जिओ मिनिट मिळतात. या प्लानमध्ये २५ एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच युजर्संना जिओ अॅप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः ४९ रुपयांचा प्लान, फ्री कॉलसोबत 2GB डेटा जिओफोनचा आणखी एक स्वस्त प्लान आहे. ४९ रुपयांच्या या प्लानची वैधता १४ दिवस आहे. प्लानमध्ये युजर्संना एकूण २ जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओ कॉलिंग एकदम फ्री आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये २५० नॉन जिओ मिनिट मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना २५ एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओ फोनचा ७५ रुपयांचा रिचार्ज प्लान जिओफोन युजर्संसाठी ७५ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना एकूण ३ जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओ फ्री कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासठी ५०० नॉन जिओ मिनिट मिळतो. प्लानमध्ये युजर्संना ५० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31JP9Sw