Full Width(True/False)

'दिल बेचारा फ्रेंडझोन का मारा'; सुशांतनं पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं

मुंबई: दिवंगत अभिनेता याच्या '' या अखेरच्या चित्रपटाचं टायटल ट्रॅक लॉन्च करण्यात आलं आहे. नुकताच चित्रपटचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला होता. प्रसिद्ध संगीतकार यांनी 'दिल बेचारा' या गाण्याला संगीत दिलं असून गायलं देखील त्यांनीच आहे. तसंच या गाण्याची कोरिओग्राफी फराह खान हिनं केली आहे. कॉलेजच्या एका ऑडिटोरिअममध्ये हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून सुशांतचा डान्स लक्षवेधी ठरत आहे. 'दिल बेचारा फ्रेंडझोन का मारा' असं हे गाणं तरुणाईला आकर्षित करणारं आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत व संजना सांघी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'दिल बेचारा' चित्रपटाच्या ट्रेलरला ४४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर युट्यूबवर या ट्रेलरला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'अॅव्हेंजर्स एंडगेम'च्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्रेलरला ३२ लाख आणि २९ लाख अनुक्रमे व्ह्यूज मिळाले होते. 'दिल बेचारा'च्या ट्रेलरला अवघ्या एका तासात पन्नास लाख व्ह्यूज मिळाले. चित्रपटात अभिनेत्री संजना ही किझी नावाचं कॅन्सरग्रस्त मुलीची भूमिका साकरेतय. तर सुशांत तिच्या प्रियकराच्या म्हणजेच मॅनीच्या भूमिकेत आहे. अत्यंत भावुक अशा ट्रेलरमध्ये दोघांच्यातलं प्रेम दिसून येतं. कॅन्सर झालेल्या किझीची अनेक स्वप्नं असतात. तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा प्रियकर सुशांतनं साकारला आहे. ट्रेलर पाहाताना आपण आपसूकच भावुक होऊन जातो. सुशांतचं या जगात नसणं पुन्हा-पुन्हा आठवत राहतं. येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अव्हर स्टार्स' या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. मुकेश छाबडा याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सुशांतसिंहनं १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं. सुशांतचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते. टीव्ही अभिनेता म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने मोठ्या संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. सुशांतने 'किस देश में है मेरा दिल' मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'काय पो छे' हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नव्हतं. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरील बायोपिकने त्याचे बॉलिवूडमधील स्थान अधिक पक्कं केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38GvCDV