Full Width(True/False)

स्वतःच्याच घरातून रिया चक्रवर्ती झाली 'बेपत्ता'

मुंबई- प्रकरणाने आता नवं वळण घेतलं आहे. सध्या या घटनेची मुख्य आरोपी अभिनेत्री तिच्या घरी नसल्याचं म्हटलं जात आहे. बिहार पोलिसांची एक टीम तिच्या घरी चौकशीसाठी गेली असता त्यांना रिया घरी भेटलीच नाही. अखेर त्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं. रियावर अटकेची टांगती तलवार आहे. सुशांतच्या वडिलांनी पटणा येथे अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल करत अनेक धक्कादाय आरोप केले आहेत. रियाने सुशांतल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्या नावाचा आणि पैशांचा वापर केला. तसेच त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्तही केलं. बिहार पोलिसांची टीम मुंबईत दाखल एफआयआर नोंदवून घेतल्यानंतर चारजणांची एक टीम मुंबईत पुढील चौकशीसाठी दाखल झाली. याप्रकरणी पहिल्या दिवसापासून चौकशी करत आहेत. जेव्हा पोलीस रियाच्या मुंबईतील घरात पोहोचले तेव्हा तिथे त्यांना रिया भेटलीच नाही. असं म्हटलं जातं की, पोलिसांच्या समोर जाण्याआधी रियाला अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करायची आहे. याप्रकरणी रियाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. बिहारमध्ये नोंदवलेल्या एफआयआरचा तपास यापूर्वी मुंबईमध्येच होत होता. यामुळे यापुढेही या प्रकरणाचा तपास मुंबई येथे करावा अशी मागणी तिने केली आहे. दरम्यान तिने स्वतः च्या बाजूने लढण्यासाठी देशातील सर्वात महागड्या वकिलाची निवड केली आहे. सतीश मानेशिंदे यांनी तिचं वकिलपत्र घेतलं आहे. सतीश यांनी सलमान खान आणि संजय दत्तची केसही सांभाळली होती. १५ कोटी रुपयांचे काय झाले सात पानी एफआयआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचे सांगितले. रिया आणि तिच्या कुटुंबियांनी जाणीवपूर्वक घडवून आणलेली गोष्ट आहे. तसेच सुशांतला मानसिकरित्या आजारी दाखवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. यासोबतच सुशांतच्या वडिलांनी काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नाची उत्तर फक्त रिया चक्रवर्तीच देऊ शकते. १. २०१९ आधी मुलाला कोणताही मानसिक त्रास नव्हता. रियाला भेटल्यानंतर असं काय झालं? २. जर त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते तर त्यासंबंधी आमची परवानगी का घेतली गेली नाही? ३. ज्या ज्या डॉक्टरांनी रियाच्या सांगण्यावर सुशांतवर उपचार केले तेही रियासोबत सामिल होते. त्यांनी सुशांतला कोणत्या गोळ्या दिल्या याचीही तपासणी व्हावी. ४. माझ्या मुलाच्या अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये होते. गेल्या वर्षभरात त्यातून १५ कोटी रुपये काढण्यात आले. पैसे अशा खात्यात गेले ज्याचा माझ्या मुलाशी काहीही संपर्क नाही. सर्व खात्यांची चौकशी व्हावी. ५. रियाच्या संपर्कात आल्यानंतर सुशांतच्या हातातून एकामागोमाग एक सिनेमे कसे जाऊ लागले होते, याचीही चौकशी व्हावी.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PkXWD3