Full Width(True/False)

पाच कॅमेऱ्याचा रेडमी नोट ९ खरेदीची आज संधी, किंमत ११,९९९ पासून सुरू

नवी दिल्लीः शाओमीचा रेडमी नोट सीरीजचा नोट ९ स्मार्टफोन बजेट किंमतीत पॉवरफुल फीचर्स करतो. आता पर्यंत झालेल्या फ्लॅश सेलमध्ये हा फोन अवघ्या काही मिनिटात आउट ऑफ स्टॉक झाला आहे. जर तुम्ही पाच कॅमेऱ्याचा खरेदी करण्याच्या विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. या फोनचा आज पुन्हा एकदा दुपारी फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता शॉपिंग साइट अॅमेझॉन आणि वरून फोन खरेदी करण्याची संधी आहे. वाचाः ची किंमत शाओमीचा हा फोन तीन रॅम आणि स्टोरेज मध्ये येतो. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः फोनला तीन रंगात खरेदी करता येवू शकते. अॅक्वा ग्रीन, आर्कटिक व्हाईट आणि पेबल ग्रे असे हे तीन रंग आहेत. याचा चौथा कलर ऑप्शन स्कारलेट रेड सुद्धा अॅमेझॉन प्राइस डे सेल २०२० च्या दरम्यान ६ ऑगस्ट रोजी खरेदी करता येवू शकते. या फोन खरेदीवर HSBC बँक कार्ड्स वर ५ टक्के डिस्काउंट आणि अॅमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्ड होल्डर्स (प्राईम मेंबर्स) ला ५ टक्के कॅशबॅक मिळतो. नॉन प्राइम मेंबर्सला या कार्डवरून ३ टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. वाचाः रेडमी नोट ९ चे खास वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी+ (1080x2340 पिक्सल्स) डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. यात मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6 जीबी LPDDR4x रॅम देण्यात आला आहे. डिव्हाईस अँड्रॉयड १० बेस्ड MIUI 11 सोबत येतो. या फोनमध्ये 9W रिवर्स चार्जिंग फीचर देण्यात आले आहे. कॅमेरा फीचर्स मध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाटी देण्यात आला आहे. रियर पॅनेलवर यात क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात सेन्सर ४८ मेगापिक्सलचा आहे. तसेच, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,020mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Pa6rjX