Full Width(True/False)

अनुभव सिन्हाने बॉलिवूड ठोकले राम-राम, दिला राजीनामा

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड सिनेसृष्टीत खूप काही बदललं. फक्त घराणेशाहीवरच वाद सुरू आहे असं नाही तर आता प्रत्येक सेलिब्रिटीवर जनतेचा डोळा आहे. कोणता सेलिब्रिटी कोणाचं समर्थन करतो आणि कोणाचे काय विचार आहेत यावर प्रत्येकाच्या नजरा आहेत. या सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू एकच आहे तो म्हणजे बॉलिवूड. अनुभव सिन्हाचा बॉलिवूडला राजीनामा यातच दिग्दर्शक यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा राजीनामा खऱ्या अर्थाने एक मोहीम असून या मोहिमेत आता इतर दिग्दर्शकही सहभागी होत आहेत. अनुभव यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'बास.. आता खूप झालं. मी बॉलिवूडमधून राजीनामा देत आहे.' या घोषणेनंतर त्यांनी आपलं ट्विटर प्रोफाइल बदललं आणि स्वतःच्या नावाच्यासमोर बॉलिवूड नाही असंही लिहिलं. अनुभवच्या या मोहिमेत इतर दिग्दर्शकही आले. सुधीर मिश्रा यांनी ट्वीट करत फक्त या मोहिमेचं समर्थनच केलं नाही तर त्यांच्यामते बॉलिवूड कधी नव्हतच. ते या सिनेसृष्टीत फक्त चांगले सिनेमे तयार करण्यासाठी आले होते. ट्वीटमध्ये लिहिले की, 'काय आहे हे बॉलिवूड.. मी तर सिनेमांचा एक भाग होण्यासाठी आलो होतो. जिथे सत्यजीत रे, राज कपूर, गुरु दत्त, बिमल रॉय, जावेद अख्तर यांसारखे लोक काम करत आहेत. मी नेहमी याच सिनेसृष्टीसोबत राहणार आहे.' का घेतला हा निर्णय- हंसल मेहता यांनीही या मोहिमेचं समर्थन करत म्हटलं की, 'मीही बॉलिवूड सोडलं. पण पाहायला गेलं तर याचं याआधाही कधी अस्तित्व नव्हतं.' सुधीर आणि हंसल यांच्या ट्वीटनंतर अनुभव फार आनंदात होते. याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'अजून एक गेला. तुम्हीही ऐका.. आता तुम्ही जेव्हा बॉलिवूडबद्दल बोलाल तेव्हा आमच्याबद्दल बोलत नसणार हे लक्षात ठेवा.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hpJMMC