Full Width(True/False)

'विधू विनोद चोप्राने मला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं'

मुंबई- सध्या बी-टाउनमध्ये ट्विटर वॉर सुरू आहे. आधी कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यात ट्विटरवर बाचाबाची सुरू झाली. आता लेखक आणि सिनेसमिक्षक अनुपमा चोप्रा यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक सुरू असलेली पाहता येत आहे. त्याचं झालं असं की चेतनने सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. त्याच्या याच ट्वीटनंतर अनुपमा आणि त्याच्यात ट्वीट वॉर सुरू झालं. अनुपमाा चोप्रा यांचे पती आणि दिग्दर्शक यांनी चेतनला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचंही त्याने या भांडणात सांगितलं. चेतन भगतने सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा 'दिल बेचारा' सिनेमाचं समीक्षण करणाऱ्या समीक्षकांशी निगडीत एक ट्वीट केलं. 'सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा या महिन्यात प्रदर्शित होत आहे. मी समीक्षकांना सांगू इच्छितो की जाणीवपूर्वक समीक्षण करा. ओव्हरस्मार्टपणा करू नका. वायफळ गोष्टी लिहू नका. निष्पक्ष होऊन लिहा. निरर्थक गोष्टींचा वापर करू नका, तुम्ही याआधीच अनेक लोकांचं आयुष्य खराब केलं आहे. पण आता थांबा. आम्ही आता पाहतोय.' अनुपमा चोप्रा यांनी चेतनच्या या ट्वीटला रिप्लाय देत म्हटलं की, 'प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही विचार करता की माणसाच्या विचार करण्याचा स्तर याहून खाली जाऊ शकत नाही. पण तो खालीच जात असतो.' आता अनुपमा यांनी दिलेल्या उत्तरावर चेतन पलटवार करणार नाही असं तर होणार नाही ना.. या वादत त्याने अनुपमा यांचे पती आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनाही आणलं. चेतनने लिहिले की, 'मॅडम, जेव्हा तुमच्या नवऱ्याने मला सर्वांसमोर धमकावले होते आणि लाज न बाळगता माझं क्रेडिट घेतलं होते. मी विचारल्यानंतरही ३ इडियट्स सिनेमात मला क्रेडिट द्यायला नकार दिला होता आणि मला आत्महत्या करण्यावर प्रवृत्त केलं होतं. तेव्हा तुम्ही फक्त तमाशा पाहत होता. तेव्हा तुमच्या विचारांचा स्तर कुठे गेला होता.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hlXKPG