नवी दिल्लीः देशाची दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन दर दिवशी १ जीबी पासून रोज ३ जीबी डेटा पर्यंत अनेक प्लान ऑफर करतात. ग्राहक आपल्या गरजेप्रमाणे प्लानची निवड करू शकतात. जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर या तीन कंपन्याकडे अनेक प्लान आहेत. ज्यात सर्वात जास्त डेटा देणाऱ्या प्लानसंबंधी जाणून घ्या. वाचाः Reliance Jio चे रोज 3GB डेटाचा प्लान जिओचा रोज ३ जीबी डेटा प्लानची सुरुवातीची किंमत ३४९ रुपयांपासून होते. तसेच ४०१ आणि ९९९ रुपयांचे दोन प्लान येतात. ३४९ रुपये आणि ४०१ रुपयांचे दोन प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात १००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. ४०१ रुपयांच्या प्लानमद्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन आणि ६ जीबी पर्यंत अतिरिक्त डेटा मिळतो. वाचाः तर, ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि ३००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. या सर्व प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. Vodafone चे रोज 4GB डेटाचे प्लान व्होडाफोन २९९ रुपये, ४४९ रुपये आणि ६९९ रुपयांचे तीन प्लान ऑफर करतात. रोज २ जीबी डेटाचे प्लान आहेत. परंतु, डबल डेटा ऑफर अंतर्गत रोज ४ जीबी डेटा मिळतो. वाचाः तिन्ही प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले व झी ५ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. २९९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. ४४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. आणि ६९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. वाचाः Airtel चे रोज 3GB डेटाचे प्लान एअरटेल रोज ३ जीबी डेटाचे तीन प्लान ऑफर करीत आहेत. ज्याची किंमत ३९८ रुपये, ४०१ रुपये आणि ४४९ रुपये आहे. ३९८ रुपये आणि ४०१ रुपयांच्या दोन्ही प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात फरक म्हणजे ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये १ वर्षांपर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. तर ४४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या तिन्ही प्लानमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएसएस मिळतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iyBsMc