Full Width(True/False)

किंग खानने बंगल्याला घातलं प्लास्टिक शिल्ड, वाचा सत्य

मुंबई- शाहरुख खानच्या '' बंगल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखचा हा बंगला वरपासून खालपर्यंत प्लॅस्टिकने झाकला आहे. अशापद्धतीने संपूर्ण घर झाकल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. करोनापासून वाचण्यासाठी शाहरुखने असं केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. मन्नतला पूर्णपणे का झाकून घेतलं ते जाणून घेऊ.. लोकांमध्ये अनेकप्रकारच्या चर्चा सध्या शाहरुखचं घर पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकने झाकलं गेलं आहे. याच घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हवेत जन्मतो त्यामुळेच शाहरुखने त्याचं घर पूर्णपणे बंद करून घेतलं आहे. पण यात तथ्य नसल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. २००१ मध्ये मध्ये शाहरुखने हा बंगला विकत घेतला होता. या घराची तेव्हाची किंमत साधारणपणे १३ कोटी ३२ लाख एवढी होती. मीडिया रिपोर्टनुसार, या घराची आताची किंमत जवळपास २०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. मन्नत बंगल्याच्या बाजूला अनेक सेलिब्रेटींची घरं आहेत. पावसामुळे संपूर्ण झाकून घेतला बंगला मन्नत बंगला पावसामुळे झाकून घेण्यात आला आहे. शाहरुखच्या जवळच्या व्यक्तीने याबद्दल माहिती देताना म्हटले की, समुद्र किनारी घर असल्यामुळे घरांवर आद्रतेचा मोठा परिणाम होतो. तसेच मन्नत पूर्णपणे झाकून घेण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही पावसामुळे बंगला प्लॅस्टिकने झाकून घेण्यात आला आहे. दरम्यान, बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. जगभरात अनेक ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी आहेत. दुबईमध्ये लग्झरी प्रॉपर्टीशिवाय सेन्ट्रल लंडनच्या पार्क लेन एरियामध्ये एक अपार्टमेन्ट आहे. यासाठी त्याने अनेक कोटी मोजलेही. या प्रॉपर्टीची किंमत जवळपास १८७ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. हे घर त्याच्या सर्वात महागड्या गोष्टींपैकी एक आहे. याशिवाय शाहरुखचं गल्फ स्टेटमध्येही अनेक प्रॉपर्टी आहेत. शाहरुखच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर २०१९ मध्ये त्याचा 'झिरो' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला होता. यानंतर २०२० मध्ये शाहरुखने एकाही सिनेमाचं चित्रीकरण केलं नाही. शिवाय नव्या प्रोजेक्टची घोषणाही केली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OHKxEL