Full Width(True/False)

अभिनेत्याच्या वडिलांचा मृत्यू, अंत्यदर्शनही नीट मिळालं नाही

नवी दिल्ली- मालिकेतील अभिनेता अमल सहरावत वर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचं व्हायरसमुळे निधन झालं. अमलच्या आईलाही करोनाची लागण झाली होती. त्या या आजारातून बऱ्या झाल्या, मात्र त्याचे वडील यातून वाचू शकले नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अमल म्हणाला की, 'माझ्या वडिलांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. आम्ही त्यांना वेगळ्या गोष्टींसाठी इस्पितळात घेऊन गेलो होतो. पण जेव्हा डॉक्टरांनी कोविड-१९ ची टेस्ट केली तेव्हा ते पॉझिटिव्ह आले. यानंतर मी त्यांची छोटीशी झलकच पाहिली. या काळात ते पूर्णवेळ आयसीयूमध्ये होते आणि गेल्या महिन्यात त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.' आईने जिंकली करोनाची लढाई, बाबा मात्र हरले- अमल म्हणाला की, 'बाबांची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही. त्यांच्यासोबतचे अनेक चांगले क्षण आणि त्यांच्या आठवणी आमच्यासोबत आहेत. करोना व्हायरसला समजणं कठीण आहे. माझ्या आईला मधुमेह असूनही ती या आजारातून वाचली. ती आता पूर्णपणे फिट आहे. पण माझे बाबा वाचू शकले नाही. बाबा आईला नेहमी आयन रेडी म्हणून हाक मारायचे. ते बरोबर होते.' अमल सध्या दिल्लीत आईसोबत आहे. तर त्याची पत्नी नेहा तलवार मुंबईत मुलासोबत आहे. या कठीण काळात नेहाने एकटीने सर्व गोष्टी सांभाळल्या याचा अमलला अभिमान आहे. तसेच छोटी सरदारनी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचे त्याने यावेळी आभार मानले. या कठीण काळात त्यांनीही सांभाळून घेतले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ElxEOE