मुंबई- आणि संजना सांघी यांचा '' सिनेमा नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला. याच्याशी निगडीत अनेक योगायोग समोर येत आहे. सिनेमाचा दिग्दर्शक मुकेश छाब्राने सिनेमातील कलाकारांच्या नावाशी निगडीत एक गोष्ट समोर आणली आहे. सुरुवातीला या गोष्टीवर त्याचं लक्ष गेलं नव्हतं. सुरुवातीला यावर कोणाचंच लक्ष गेलं नाही मुकेशने ट्वीट करत म्हटलं की, कसला योगायोग.. मला कोणीतरी सांगितलं की, 'दिल बेचारा' सिनेमातील मुख्य कलाकारांची नावं 'एस'वरून सुरू होतात. याकडे माझं याआधी लक्षच गेलं नव्हतं. सुशांत, संजना, सैफ, स्वास्तिका, सास्वता, साहिल वैद, सुनीत टंडन (डॉक्टरांची व्यक्तिरेखा साकारलेले) संजनाच्या नाकातून वाहू लागलं रक्त संजना सांघीनेही एका मुलाखतीत सांगितलं होतं की, चित्रीकरणावेळी भावनिक सीनच्या वेळी तिची आणि सुशांतची तब्येत बिघडायची. सीन पुरा होताच दोघांच्याही तब्येतीत सुधार व्हायचा. पॅरिसमध्ये स्मशानभूमीतील एका सीनवेळी तिच्या नाकातून अचानक रक्त वाहू लागलं होतं. तिला स्वतःलाही माहीत नव्हतं की तिच्या नाकातून रक्त वाहत आहे. सुशांतचं लक्ष तिच्या नाकाकडे गेलं आणि नंतर तातडीने नाकाला बर्फ लावण्यात आला. शेवटच्या सिनेमातही सुशांतने शाहरुखला दिली मानवंदना या सिनेमातील अनेक गोष्टी सुशांतच्या खऱ्या आयुष्याशी निगडीत आहेत. हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की सुशांत शाहरुखचा फार मोठा चाहता होता. दिल बेचारा सिनेमात त्याने शाहरुखच्या 'दिलवाले दुलहनिया ले जाएंगे' सिनेमातील एक सीन रीक्रिएट केला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WYKqJi