स्वस्तात मस्त आणि कमी बजेट असलेला फोन खरेदी करायचा असल्यास भारतीय बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. अवघ्या साडे पाच हजारांपेक्षा कमी किंमतीत हे स्मार्टफोन खरेदी करता येवू शकतात. कमी किंमतीत कोणता चांगला स्मार्टफोन आहे. हे तुम्ही फोनची किंमत आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर ठरवता येवू शकता येते. सॅमसंगने भारतात आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी M01 Core लाँच केला आहे. फोनची सुरुवातीची किंमत ५ हजार ४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉयड गो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. किंमत आणि ऑपरेटिंग सिस्टमला पाहता सॅमसंगच्या या फोनची थेट टक्कर Nokia 1 आणि शाओमीच्या Redmi Go स्मार्टफोन सोबत होईल. जाणून घ्या ग्राहकांसाठी या तीन फोनपैकी कोणता फोन बेस्ट आहे...

सॅमसंग गॅलेक्सी M01 कोर स्मार्टफोन दोन मॉडल मध्ये येतो. यात १ जीबी रॅमव १६ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत ५ हजार ४९९ रुपये आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. नोकिया स्मार्टफोनचा एकच व्हेरियंट (1GB + 8GB) येतो. याची किंमत फ्लिपकार्टवर ४ हजार ६७२ रुपये आहे. तर शाओमीचा रेडमी गो च्या 1GB + 16GB मॉडलची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे.

सॅमसंग फोनमध्ये ५.३ इंचाचा एचडी+ TFT डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेजॉलूशन 720x1480 पिक्सल आहे. तर नोकियाच्या फोनमध्ये 4.50-इंच IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रेजॉलूशन 480x854 पिक्सल आणि रेडमी गो मध्ये 5.0 इंचाचा HD डिस्प्ले मिळतो. ज्याचा रेजॉलूशन 720×1280 पिक्सल आहे. म्हणजेच सॅमसंगच्या फोनमध्ये सर्वात चांगला डिस्प्ले आहे. स्वस्तात मस्त आणि चांगला डिस्प्लेचा फोन खरेदी करायचे तुमच्या डोक्यात विचार सुरू असेल तर या फोनवर एक नजर टाका.

सॅमसंग गॅलेक्सी M01 कोर स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक 6737 प्रोसेसर आणि नोकिया फोन मध्ये मीडियाटेक 6739 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर शाओमी च्या एंट्री लेवल स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर दिला आहे. या तीन्ही फोनच्या प्रोसेसर पााहिल्यास आपल्याला अंदाज बांधता येवू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी M01, नोकिया फोन मध्ये , शाओमी च्या एंट्री लेवल स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर मुळे या तिन्ही फोनमध्ये कोणता फोन बेस्ट आहे. हे ग्राहक फोन खरेदी करण्याआधी ठरवू शकतो.

या तिन्ही फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा दिला आहे. सॅमसंग आणि रेडमी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर नोकिया स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी कॅमेऱ्यात सॅमसंग आणि रेडमी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर नोकिया १.० मध्ये २ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. फोटो काढण्याची आवड असणाऱ्यांसाठी या फोनमधील कॅमेऱ्यावर एक नजर टाकून फोनची निवड करता येवू शकते.

सॅमसंग आणि रेडमी गो या दोन्ही फोनमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. सॅमसंगचा दावा आहे की, त्यांचा फोन ११ तासांपर्यंत टॉकटाइम, तर रेडमीचा दावा आहे की, त्यांचा फोनवरून १२.५ तासांची ४ जीबी कॉलिंग मिळू शकते. नोकियात 2150mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. नोकियाच्या तुलनेत सॅमसंग आणि रेडमी गो या दोन्ही फोनची बॅटरी क्षमता जास्त आहे. त्यामुळे साडे पाच हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत फोन खरेदी करायचा असेल तर हे तीन्ही फोन एक चांगले पर्याय होऊ शकतात.



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hC01Gy