Full Width(True/False)

सुशांतचे ५० सिम कार्ड आणि रहस्यमयी मृत्यूवर प्रश्न

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला दिड महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मुंबई पोलीस यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती गोळा करत आहे. मात्र सुशांतच्या चाहत्यांना ही केस सीबीआयने पाहावी असेच वाटत आहे. यासाठीची मागणी वारंवार सोशल मीडियावर होताना दिसत आहे. आता दिल्लीचे वकील ईशकरण भंडारी यांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या तपासातील उणीवा दाखवत त्यांनीही करण्याचा आग्रह केला आहे. ईशकरण भंडारी म्हणाले की, जोपर्यंत सीबीआयद्वारे खऱ्या गोष्टी समोर येत नाहीत तोवर सुशांतच्या केसकडे एक रहस्यमय मृत्यू म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. १४ जूनला राहत्या घरी सुशांत मृत अवस्थेत सापडला. पोलिसांनी या घटनेला आत्महत्या म्हणून घोषीत केलं. पण सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह अनेक लोकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. अभिनेता शेखर सुमनसह भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याचा आग्रह धरला. मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी करण्यास स्पष्ट नकार दिला. तसंच मुंबई पोलीस यासंबंधी चौकशी करण्यास सक्षम असल्याचं सांगितलं. भंडारी पुढे म्हणाले की, आत्महत्या हा शब्द सुशांतच्या मृत्यूच्या काही मिनिटांमध्ये समोर आला आणि मीडियाने तोच शब्द उचलून धरला. पण याची चौकशी होणं गरजेचं नव्हता का? पूर्ण चौकशी झाल्यानंतर सुशांतचा मृत्यू अपघात होता, आत्महत्या होती किंवा खून होता याच्या निष्कर्षापर्यंत पोहचू शकतो. पण मुंबई पोलिसांनी याआधीच याला आत्महत्या म्हणून घोषित केलं. काही मिनिटांमध्ये या निष्कर्षावर कसे पोहोचले? वकील पुढे म्हणाले की, 'असं म्हटलं जातं की, सुशांतसिंह राजपूतने त्याच्या फोनचे आतापर्यंत ५० सिम कार्ड बदलले आणि जर असं झालं असेल तर पोलिसांनी ते कार्ड सीझ केले का? तसेच मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात मी स्पष्ट लिहिलं सुशांतने ५० सिम कार्ड बदलले ही माहीत सूत्रांकडून मिळाली आहे.' तसेच ईशकरण यांनी मुंबई पोलिसांना पत्रात विचारले की, त्यांनी सुशांतचं मुंबईतलं घर सील केलं का? जर केलं नसेल तर हे फारच आश्चर्यकारक आहे आणि तपासात सर्वात मोठी चूक आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही. जर सुसाइड नोट मिळाली असती तर केसचा थेट निकाल लागला असता. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत रिया चक्रवर्ती, संजना संघी, संजय लीला भन्साळी, राजीव मसंद, रोहिनी अय्यर, मुकेश छाब्रा, आदित्य चोप्रा, रूमी जाफरी यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. आज दिग्दर्शक महेश भट्ट आणि करण जोहरच्या मॅनेरजची चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे मृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32ZbSKW