मुंबई- बॉलिवूडमध्ये होत असलेल्या आणि गटबाजीवर आता अभिनेता याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयसने त्याचा संघर्ष आणि स्टार किड्सबद्दल भाष्य केलं. श्रेयसने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, 'त्या संघर्षाच्या काळात माझ्याकडे भाडं देण्यासाठी, सॅण्डविच विकत घेण्यासाठी आणि बसमधून स्टूडिओपर्यंत जाण्याचेही पैसे नव्हते. स्टार किड्सना स्वबळावर यश मिळवणं आणि कष्टाने मिळवलेल्या सॅण्डविचची चव कधीच चाखता येणार नाही. त्यांना जे विशेषाधिकार मिळत आहेत त्यांना ते मिळू दे. मला तर याचं वाईट वाटतं की त्यांच्याकडे आमच्यासारखा सुंदर प्रवास नसतो.' आतापर्यंत केलं नाही , यशराज फिल्ममध्ये काम श्रेयसला त्याने केलेल्या संघर्षाचा अभिमान आहे. श्रेयस म्हणाला की, त्याने आजपर्यंत एकाही करण जोहरच्या आणि यशराज प्रोडक्शनच्या सिनेमांमध्ये काम केलं नाही. पण यामुळे त्याच्या करिअरमध्ये कोणताही फरक पडला नाही. 'घराणेशाही आणि गटबाजी इथे नेहमीच राहणार. पण जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा अशा गोष्टींवरच लक्ष केंद्रीत करू शकत नाही. किमान मी तरी अशा गोष्टींचा फार विचार करत नाही. मी आजपर्यंत एकाही करण जोहर आणि यशराज फिल्मसोबत काम केलं नाही. मी कधी त्यांच्यापर्यंत गेलो नाही आणि त्यांनीही कधी माझ्या कामात रुची दाखवली नाही. पण म्हणून मी लहान कलाकार ठरलो नाही. तसेच या दोघांसोबत काम केलं नाही म्हणून माझं करिअर संपलं असंही नाही.' आता आमिर आणि सलमानसोबत काम करण्याची इच्छा बिग बॅनरसोबत काम न मिळाल्याचं दुःख व्यक्त न करता श्रेयसला अशा लोकांसोबत काम करण्याचा आनंद आहेत ज्यांच्या कामाचा तो चाहता आहे.अमिताभ बच्चन, नसीरुद्दीन शाह, अजय देवगण, शाहरुख खान, दिग्दर्शिका फराह खान आणि रोहित शेट्टीसोबत काम केल्याचा त्याला अभिमान आहे. याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला की, 'आता मला आमिर खान आणि सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. पण यानंतर मी अशा लोकांसोबतच काम करेन जिथे मला बरोबरीचं स्थान असेल. कारण मीही इथपर्यंत पोहोचण्यासाठी तेवढीच मेहनत घेतली आहे.' तुमच्यातली प्रतिभा आणि मेहनत सारं काही ठरवते श्रेयस तळपदेच्यामते, स्टार किड्सना सुरुवातीला सिनेमे मिळतात पण बाकी सर्व गोष्टी तुमच्या प्रतिभेवर आणि मेहनतीवर अवलंबून असतात. 'ही गोष्ट सर्वांनाच माहीत असते.. आम्हालाही माहीत असते पण ती स्वीकारायलाच वेळ लागतो. या गोष्टी जितक्या लवकर समजू तेवढे लवकर समजूतदार होऊ'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WXWmLx