Full Width(True/False)

मीही झालोय घराणेशाहीचा शिकार- सैफअली खान

मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत बी-टाउनमधून कंगना रणौत आणि सिनेसृष्टीतील काही सेलिब्रिटी याबद्दल बोलताना पाहायला मिळत होते. पण आता मात्र अनेक स्टार कलाकारांनीही याबद्दल बोलण्याचं ठरवलं असल्याचं दिसत आहे. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने याविषयी अनेक धक्कादाय विधानं केली आहेत. मीही झालो घराणेशाहीचा शिकार- अभिनेता अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. स्वतः सैफची आई प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे स्टार किड म्हणूनच त्याच्याकडे पाहण्यात आले. संपूर्ण सिनेसृष्टीत सैफचे चांगले संबंधही आहेत. असं असतानाही सैफलाही घराणेशाहीचा सामना करावा लागल्याचं त्याने सांगितलं. एका वेबिनारमध्ये त्याने हे विधान दिलं. सैफ म्हणाला की, 'घराणेशाहीचा शिकार तर मीही झालो. पण कोणालाही यात स्वारस्य नाही. व्यवसाय असाच चालतो. मी कोणाचंही नाव घेणार नाही पण अनेकदा असं व्हायचं की कोणाच्यातरी वडिलांचा फोन यायचा आणि मला न घेण्याबद्दल सांगितलं जायचं. हे असं होत राहतं आणि माझ्यासोबतही झालं.' स्वतः सैफला या घराणेशाहीचा फारसा पुळका नाही. याबद्दल बोलताना सैफ म्हणाला की, 'एखाद्या विशेष वर्गाला जास्त महत्त्व देणं आणि त्याहून जास्त कौशल्य असणाऱ्या लोकांना मागे सोडणं योग्य नाही. या घराणेशाहीची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सर्वोत्तम लोकांना बाजूला सारून अशा लोकांना संधी दिली जाते जे फार प्रतिभावान नसतात. असं का होतं याचं माझ्याकडे तरी उत्तर नाहीये.' पंकज- नवाजने तयार केली स्वतःची वेगळी ओळख सुशांतसिंह राजपूतच्या निधनावरही सैफने आपली प्रतिक्रिया दिली. सैफच्या मते सुशांतला हे माहीत होतं की सिनेसृष्टीत होते. सैफ म्हणाला की, 'सिनेसृष्टीत हा संर्घष तर सुरुच असतो. पण प्रत्येकाला समान संधी मिळाल्या पाहिजेत.' याशिवाय अनेक बाहेरून आलेल्या कलाकारांनी स्वतःच्या हिंमतीवर स्थान मिळवल्याचा सैफला आनंदही आहे. याबद्दल उल्लेख करताना त्याने पंकज त्रिपाठी आणि नवाजच्या यशाचा उल्लेख केला. सैफ अली खानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर 'दिल बेचारा' या सुशांतसिंह राजपूतच्या सिनेमात सैफने पाहुण्या कलाकाराची भूमिका वठवली आहे. या सिनेमात सुशांतसोबत संजना संघीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. डिझनी हॉटस्टारवर येत्या २४ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gfDRcw