नवी दिल्लीः भारत सरकारकडून ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या यादीत शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅपच्या जागी आता इंडियन अॅप्स वेगाने प्रसिद्ध होत आहेत. यातील एक म्हणजे चिंगारी अॅपची वेबसाईट सोबत छेडछाड झाल्याचा आणि हॅकिंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. चिंगारी अॅपला ऑपरेट करणारी कंपनी Globussoft ची वेबसाईटच्या कोड्स मध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाचाः कंपनीच्या वेबसाईटच्या सर्व पेजेसमधील एक स्क्रीप्ट अॅड करण्यात आली आहे. ज्यात मॅलिशस कोडचा समावेश होता. याच्या मदतीने युजर्सला वेगवेगळ्या वेबसाइट्सवर रिडायरेक्ट केले जावू शकते. Globussoft ची वेबसाइटची कमतरता सिक्योरिटी रिसर्चर एलियट एल्डरसन ने माहिती काढली आहे. याआधी एलियटकडून आरोग्य सेतू अॅपच्या एका प्रायव्हसी संबंधी माहिती देण्यात आली होती. वाचाः सुरक्षित आहे युजर्सचा डेटा चिंगारी अॅपचे सह संस्थापक सुमित घोष यांनी याप्रकरणी बोलताना सांगितले आहे की, Globussoft हा अॅपचा एक भाग असला तरी युजर्संना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचू शकत नाही. घोषने म्हटेल wp इश्यू ला माझ्यासमोर पॉइंट आउट करण्यासाठी धन्यवाद. चिंगारीला Globussoft सोबत तयार करण्यात आले आहे. तसेच हे आम्हीच बनवले आहे. चिंगारी अॅप किंवा वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित आहे. याचा युजर्सवर कोणताही परिणाम होणार नाही. वाचाः टॉप चार्ट्समध्ये चिंगारी अॅप फाउंडर सुमित घोष यांच्या माहितीनुसार, वेबसाइटवर सध्या जो इश्यू येत आहे. तो लवकर निकाली काढला जाईल. 'Globussoft वेबसाइट आणि चिंगारी अॅप दोन्ही सिक्योरिटी आणि इंजिनियरिंग टीम वेगवेगळी आहेत. चिंगारी लवकरच एक स्वतंत्र कंपनी बनणार आहे. लाँच होण्याआधी १५ दिवसात या अॅपला १० लाखांहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर हे अॅप टॉप चार्ट्स मध्ये पोहोचले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VCIeqh