नवी दिल्लीः भारत सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनवर आणखी एक केला आहे. भारताना ४७ अॅप्सवर बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४७ अॅप्स हे आधीच्या ५९ अॅप्सचे क्लोन आहेत. कोणत्या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, या अॅप्सचे नाव समोर आले नाहीत. तसेच या अॅप्सच्या बंदी संबंधी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. वाचाः भारत सरकारने एकूण १०६ अॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारने २७५ चीनी मोबाइल अॅपवर बंदी घालण्यासाठी एक यादी तयार केली आहे. या सर्वांवर बंदी घालण्यात येणार आहे. या यादीत पबजी आणि जिली यासारख्या अॅपचा समावेश आहे. इकॉनॉमिक टाइम्स रिपोर्टनुसार, या यादीत पबजी गेम, जिली, कॅपकट, फेसयू, Meitu, एलबीई टेक, परफेक्ट कॉर्प, सीना कॉर्प, नेटीज गेम्स, अलीएक्सप्रेस, रेसो आणि यूलाइक या अॅपचा समावेश आहे. भारतात या अॅप्सवर घातली बंदी वाचाः भारताविरोधात फेक न्यूजचा आरोप, जॅक माची नोटीस चीनची कंपनी यूसी वेबवर भारताविरोधात न्यूज चालवण्याविरोधात आरोप लावले आहेत. चीनच्या अलीबाबा ग्रुपची कंपनी यूसी वेब च्या विरोधात माजी असोसिएटेड डायरेक्टर ने गुडगाव कोर्टात याचिका दाखल केली आहे. वेबसाइटवर चालवलेल्या फेक न्यूजचे विरोधात केले आहेत. कंपनीने त्यांना नोकरीवरून काढले आहे. सिव्हील न्यायाधीश सोनिया श्योकंदच्या कोर्टात अलीबाबा आणि फाउंडर जॅक मा ला नोटिस पाठली आहे. चीनकडून आगपाखड भारत सरकारकडून जूनच्या अखेरच्या आठवड्यात ५९ चायनीज अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. यानंतर या अॅप्सला भारतीय युजर्संसाठी गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले. तसेच या अॅप्सचा अॅक्सेस संपूर्णपणे ब्लॉक करण्यात आला आहे. परंतु, भारताच्या या निर्णयावर चीनने नाराजी दर्शवली आहे. नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत या अॅप बंदीचा मुद्दा चीनने उपस्थित केला होता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EnFTK5