मुंबई- सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला. त्याचा हा सिनेमा पाहून सुशांतला ओळखणारे आणि त्याचे चाहते फारच भावुक झाले आहेत. सिनेमा पाहताना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. आता त्किती सेनॉननेही सिनेमा पाहून झाल्यावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. क्रितीने पोस्टमध्ये लिहिले की, सिनेमा पाहून पुन्हा एकदा जीव तुटला. क्रिती म्हणाली की, मॅनीला पाहताना अनेककदा असं जाणवलं की सुशांत पुन्हा एकदा जीवंत झाला. दिल बेचारा सिनेमातील त्याच्या फोटोंची एक क्लिप शेअर करताना क्रितीने लिहिलं की, 'हे बरोबर नाहीये. (Its not seri) आणि हे कधीही ठीक होणार नाही... पुन्हा एकदा माझं हृदय तुटलं. मॅनीमध्ये मला अनेक क्षणांत तू जीवंत झाल्यासारखं वाटलं. या व्यक्तिरेखेत तू स्वतःला कुठे झोकून दिलं असशील याची मला कल्पना आहे. नेहमीप्रमाणे तुझ्या शांत राहण्यातच तुझी जादू होती.. त्या क्षणांमध्ये तू काहीच बोलला नाहीस पण खूप काही सांगून गेलास..' क्रितीने पुढे लिहिले की, 'मुकेश छाब्रा मला पूर्ण कल्पना आहे की आम्ही जो विचार केला, तुझ्यासाठी त्याहून अनेक पटीने जास्त स्पेशल आहे. तू पहिल्याच सिनेमात आम्हा सर्वांना भावुक केलं. संजना सांघी तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' दिल बेचारा या सिनेमातून अभिनय क्षेत्रात संजनाने आणि दिग्दर्शन क्षेत्रात मुकेशने पदार्पण केलं. दरम्यान, त्याची एक्स गर्लफ्रेंड नेही या सिनेमासाठी एक खास पोस्ट शेअर केली. वित्र रिश्ता ते दिल बेचारा...! एकदा शेवटचं....असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अंकितानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील अंकिताला धीर देण्याचा प्रयत्न केलाय. सुशांतच्या निधनानंतर अंकिता मनानं खचली असल्याचं पाहायला मिळतंय. सुशांतच्या निधनापूर्वीची अंकिता आणि सध्याची अंकिता याच्यात खूपच फरक असल्याचं चाहते म्हणतातयत. सतत सोशल मीडियावर काही तरी पोस्ट करणारी अंकिता अचानक आता गप्प झाली. तिनं गेल्या महिन्यापासून तीन पोस्ट शेअर केल्या, त्या देखील सुशांतसाठीच आहेत. त्यामुळं तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी आणखी वेळ हवा आहे, असं तिच्या जवळच्या मैत्रिणीनं म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30RXEbU