नवी दिल्लीः आज खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. आज दुपारी १२ वाजता या फोनचा सेल आयोजित करण्यात आला आहे. अॅमेझॉनवरून हा फोन खरेदी करता येवू शकेल. या फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या फ्लॅश सेलमध्ये हा फोन काही मिनिटाच्या आत आउट ऑफ स्टॉक झाला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. वाचाः रेडमी नोट ९ प्रोची किंमत या फोनची सुरुवातीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनच्या ६ जीबी रॅमची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. फोनचे फीचर्स शाओमीच्या या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनच्या सेफ्टीसाठी फोनमध्ये गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन दिला आहे. 6जीबी पर्यंतच्या LPDD4X रॅमच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे. १२८ जीबीच्या UFS 2.1 स्टोरेजच्या या फोनमध्ये स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः फोनच्या रियरमध्ये ४ कॅमेरे फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर, ५ मेगापिक्सलचा टर्शिअरी सेंसर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला तुम्हाला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला असून फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020 mAh बॅटरी दिली आहे. फास्ट बॅटरी चार्जिंगसाठी यात १८ वॉट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/307IBMh