अधिकृत लाँचच्या आधी Nokia 2.4 अनेक वेळा स्पॉट झाला आहे. Nokia 2.4 वरून कंपनी एन्ट्री लेवल आणि बजेट सेगमेंटला टार्गेट करणार आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर MediaTek Helio P22 प्रोसेसर सोबत येवू शकतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले आणि याचा ऑस्पेक्ट रेशियो 19:9 असू शकतो. या फोनमध्ये २ जीबी रॅम दिला जावू शकतो. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमसोबत येईल. फोनच्या रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. तर याचा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनमध्ये 4,500 mAh बॅटरी असू शकते.
Nokia 8.3 5G मध्ये २.४ सोबत रशियन सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला या फोनला शोकेस केले होते. परंतु, आता हे मार्केटमध्ये आले नाही. नवीन ५ जी नोकिया फोन फुल HD+ रेजॉलूशन सोबत येतो. या फोनमध्ये ६.८ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर फोनच्या बॅकला ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये क्वॉड रियर प्योरव्ह्यू कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आला असून फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,500 mAh बॅटरी दिली आहे.
Nokia 9.3 PureView कंपनीच्या नवीन लाइन-अप मध्ये सर्वात प्रीमियम फोन असणार आहे. आधीच्या मॉडल प्रमाणे या फोनच्या रियरमध्ये पाच कॅमेरे असणार आहेत. हा स्मार्टफोन 120Hz डिस्प्ले आणि क्वॉलकॉम चा टॉप-इंड स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर ऑफर करणार आहे. नोकियाच्या फोनला भारतात चांगली मागणी आहे. सध्या भारत चीन यांच्यातील संबंध बिघडल्याने देशात चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे. चायनीज फोन खरेदी करायचा नाही असे सोशल मीडियावरुन आवाहन केले जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नोकियाचे फोन लाँच झाले तर या फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
नोकिया ७.३ एक मिड रेंज स्मार्टफोन असू शकतो. या फोनच्या रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा किंवा ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सोबत क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला जावू शकतो. फोनच्या फ्रंटला २४ किंवा ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. तर Nokia 6.3 स्मार्टफोन स्नॅपड्र्रगन 700 सीरीज चिपसेट सोबत येवू शकतो. फोनच्या बॅकला ४ कॅमेरे असू शकतात. ३ जीबी रॅम प्लस ६४ स्टोरेजच्या या व्हेरियंटची किंमत २० हजार रुपये असू शकते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Es8PRb