मुंबई- ११ जुलैपासून करोनावर उपचार घेत आहेत. नानावटी इस्पितळात त्यांच्यावर आणि अभिषेक बच्चनवर उपचार सुरू आहेत. सोमवारी त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना इस्पितळातून घरी सोडण्यात आले. बिग बी यांनी सोशल मीडियावर स्वतः याबद्दल माहिती दिली. दोघी या आजारातून सुखरूप बाहेर पडल्याच्या आनंदात बिग बी स्वतःचे आनंदाश्रू रोखू शकले नाहीत. याचा उल्लेख त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केला. यासोबतच त्यांनी अशा एका ट्रोलला उत्तर दिलं ज्याने त्यांच्या मरण्याची इच्छा व्यक्त केली होती. बिग बी म्हणाले, तुला माहीत नाहीये तुझे वडील कोण आहेत अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या घरी गेल्याबद्दल लिहिले.. तसेच ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला उत्तर देताना लिहिले की, 'आशा व्यक्त करतो की तू या करोनाने मरशील..' बेनावी मेसेज लिहिणाऱ्या तू तुझ्या वडिलांचं नावही लिहिलं नाहीस. कारण तुला कदाचित आपल्या वडिलांचं नावच माहीत नसेल. फक्त दोन गोष्टी होऊ शकतात एक तर मी मरेन किंवा वाचेन.. जर मी मेलो तर सेलिब्रिटीबद्दल असं लिहिल्यानंतर तू आधीच स्वतःचं नाव खराब करून घेतलंस त्यामुळे दुसऱ्या कोणाबद्दल तू असं काही लिहू शकत नाहीस.. तुझ्यावर तर दया येते. तुझी ही कमेन्ट फक्त एवढ्यासाठी लक्षात आली कारण तू अमिताभ बच्चन यांच्याबद्दल वाईट बोललास.. जो जास्त काळ राहणार नाहीये.. चाहत्यांना सांगेन ठोक दो साले को... अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले की, 'देवाच्या कृपेने जर मी यातून वाचलो तर फक्त माझ्याकडूनच नाही तर ९० लाखांहून जास्त चाहत्यांकडून त्याला अनेक खडे बोल ऐकून घ्यावे लागणार आहेत.' एवढंच नाही तर त्यांनी कठोर शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, 'मी अजून त्यांना असं काही करायला सांगितलं नाहीये पण जर मी वाचलो.. आणि मी आत्ताच सांगतो की त्यांच्या मनात राग आहे.. ते तुला शोधण्यासाठी जग पार करतील.. पश्चिमपासून पूर्वेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणेकडे सगळीकडे तुझा शोध घेतील. मी त्यांना शेवटी सांगेन.. 'ठोक दो साले को''


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39xX72Z