Full Width(True/False)

सलमानचं सरोज खान यांना दिलेलं वचन राहिलं अपूर्ण

मुंबई- यंदाचं वर्ष हे बॉलिवूडकरांसाठी फारसं चांगलं नाही असंच म्हणावं लागेल. ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गुरुवारी मध्यरात्री १ वाजून ५२ मिनिटांनी गुरुनानक इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यासोबत काम केलेला प्रत्येक कलाकार आज त्यांची आठवण काढत आहे. सोशल मीडियावर त्यांचे जुने फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी त्यांनी काम मिळत नसल्याचंही बोलून दाखवलं होतं. याबद्दल जेव्हा सलमान खानला कळलं तेव्हा त्याने सरोज खान यांची भेट घेतली आणि पुढील सिनेमात काम देण्याचं वचन दिलं. सलमान आणि सरोज दोघांनी 'बीवी हो तो ऐसी' आणि 'अंदाज अपना अपना' सह अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सलमानने दिलं होतं वचन याबद्दल बोलताना सरोज यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा सलमानने मला विचारलं की मी सध्या काय करतेय. तेव्हा मी त्याला प्रामाणिकपणे बोलले होते की, सध्या माझ्याकडे कोणतंही काम नाहीये आणि मी नव्या पिढीला इंडियन क्लासिकल शिकवू इच्छिते. हे ऐकताच त्याने आता तुम्ही माझ्यासोबत काम कराल असं सांगितलं. मला माहितीये की सलमान दिलेला शब्द पाळतो.' सलमानव केले होते आरोप- २०१६ मध्ये सलमानने सरोज यांना दुर्लक्षित केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सरोज खान म्हणाल्या होत्या की, एकदा एका रुग्णाला सलमानसोबत बोलायचं होतं. तेव्हा सरोज यांनी त्यांच्या सहकाऱ्याला सलमानला फोन करून मास्टरजींना बोलायचं असल्याचा निरोप द्यायला सांगितला होता. पण सलमानने फोनवर बोलण्यास नकार दिला. याबद्दल बोलताना सरोज म्हणाल्या होत्या की, 'ही फार वाईट वागणूक होती. सलमान मला चांगला ओळखतो. आम्ही दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र कामही केलं होतं. पण अशा पद्धतीची वागणूक ही अपमानास्पद होती.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZwsnL8