Full Width(True/False)

Saroj Khan-बॉलिवूड दुःखात, माधुरी दीक्षित झाली भावुक

मुंबई- प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिक यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गुरुवारी मध्यरात्री १ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शुक्रवारी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर चारकोप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. सरोज खान यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं. जेनेलिया डिसूजा- देशमुख, रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, सुनील ग्रोवर,अक्षय कुमार, कोरिओग्राफर रेमो डिसूजा, निमरत कौर आणि यांनी भावुक मेसेज लिहित सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली. रेमो डिसूजाने सरोज यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, 'मी फार नशीबवान आहे की मला तुमच्यासोबत डान्स करण्याची संधी मिळाली. मला इतकं काही शिकवण्यासाठी तुमचे खूप आभार. तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल आणि तुमची नेहमी आठवण येईल.' तर जेनेलिया डिसूजा- देशमुखने लिहिले की, 'मी देवाचे आभार मानते की तुम्ही माझ्यासाठी नृत्यदिग्दर्शन केलं. या कठीण देव काळात तुमच्या घरच्यांना ताकद देवो.' रितेश देशमुखने ट्वीट करत म्हटलं की, 'हे बॉलिवूड आणि सिनेप्रेमींसाठीचं नुकसान कधीही न भरून येणारं आहे. २ हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या सरोज यांनी गाणं शूट कसं केलं जातं याची परीभाषाच बदलली. अलादीन सिनेमासाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. माझ्या बकेट लिस्टमधील एक स्वप्न त्यांनी पूर्ण केलं होतं.' अभिनेत्री निमरत कौरने सरोज खान यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत ट्वीट केलं. 'सरोज जी यांच्या नावानेच माझ्या आयुष्यात कोरिओग्राफी हा शब्द आला. एक प्रतिभावान व्यक्ती ज्यांनी कलाकारांना अमर केलं आणि त्यांनी आपल्या कामातून एक युग संपन्न केलं. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना ताकद मिळो. त्यांच्यासारखं दुसरं कोणी होऊ शकत नाही.' टीव्ही अभिनेता सुनील ग्रोवरने ट्वीट करत लिहिलं की, 'सरोज खान यांच्या निधनाच्या बातमीने अजूनही धक्यात आहे. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.' या सगळ्यात सरोज खान यांची सर्वात आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितही भावुक झाली. माधुरी आणि सरोज यांनी एकत्र अनेक हिट गाणी दिली. माधुरीने इन्स्टाग्रामवर सरोज यांच्यासोबतचे फोटो शेअर करत म्हटलं की, 'आज मला शब्द सुचत नाहीयेत. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून सरोजजी माझ्यासोबत होत्या. त्यांनी मला खूप काही शिकवलं. फक्त डान्सच नाही तर त्याहून अधिक त्यांनी मला शिकवलं. माझं हे नुकसान कधीही न भरून येण्यासारखं आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38n3up6