Full Width(True/False)

सुशांतच्या बॅंक अकाऊंटचे तपशील आले समोर; सीएनं केला धक्कादायक खुलासा

मुंबई: अभिनेता याच्या वडिलांनी पटणा इथं अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली. रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले. सुशांतच्या बॅंक अकाऊंटमध्ये तब्बल १७ कोटी रुपये होते. परंतु रिया त्याच्या आयुष्यात आल्यानंतर ही रक्कम इतर अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आली होती. असं रियाविराधात दाखल केलेल्या एफआयरमध्ये म्हटलं गेलं आहे. याच संदर्भात सुशांतच्या सीएनं देखील मौन सोडलं असून काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतच्या वडिलांनी दावा केला असला तरी त्याच्या बॅंक खात्यात इतकी रक्कम नव्हतीच , असं त्याच्या सीएनं म्हटलं आहे. सुशांतच्या अकाऊंटमधून रिया आणि तिच्या कुटुंबियांसाठी अनेकदा पैसे खर्च झाल्याचंही त्याच्या सीएनं सांगितलं आहे. सुशांत बॉलिवूड अभिनेता असल्यानं त्याचे खर्चही मोठे होते. शॉपिंग, फिरणं आणि इतर खर्च त्याच्या अकाऊंटमधून झाल्याचं सीएनं सांगितलं आहे. गेले काही महिन्यांपासून सुशांत आणि रिया एकत्र राहत होते. परंतु दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रिया सुशांतची महत्त्वाची कागदपत्रं, पैसे, काही दागिणे. लॅपटॉप घेऊन निघून गेली, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर लावला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ppr9wF